Monday, January 20, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

Health Tips : नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

Subscribe

आजकालच्या कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या प्रत्येकाला शिफ्टमध्ये काम करण्याची सक्ती असते. मेडिकल, कॉल सेंटर्स सारखी काही क्षेत्रं आहेत जिथे 24 तास काम करावं लागतं अशात व्यक्तिला नाईलाजाने नाईट शिफ्ट करावी लागते. प्रत्येकाच्या शरीराचा एक पॅटर्न असतो जो दिवसा काम करण्यासाठी आणि रात्री झोपण्यासाठी अनुकूल असतो. परंतु नोकरीकरता आपल्याला या पॅटर्नच्या विरुद्ध काम करावे लागते. ज्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

संशोधनानुसार असं सिद्ध झालंय की नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचा धोका इतर महिलांपेक्षा 3 पटीने जास्त असतो. या रिसर्चनुसार, 24 तासांच्या शरीराच्या नियमित वेळापत्रकामध्ये जर बदल झाला तर कॅन्सरच्या पेशी निर्माण होण्याचा धोका वाढतो आणि शरीरात गाठी बनू लागतात.

मेलाटोनिन आहे गरजेचे :

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याचं प्रमुख कारण आहे मेलाटोनिनचं उत्पादन. हे एक अशाप्रकारचं हार्मोन आहे जे रात्री झोपेच्या वेळी शरीरात तयार होते. परंतु रात्री झोप न घेतल्यास याचं शरीरात उत्पादनच होत नाही. ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. कारण हे हार्मोन शरीरात कॅन्सरच्या गाठी निर्माण होऊ देत नाही.

धूम्रपान :

काही महिला रात्रभर जागण्यासाठी धूम्रपानदेखील करतात. असं पाहण्यात आलंय की नाईट शिफ्टमध्ये काम करणारे लोक दिवसापेक्षा रात्री जास्त धूम्रपान करतात जेणेकरुन त्यांना झोप येऊ नये. जास्त धूम्रपानही शरीरातील कॅन्सरच्या पेशींना वाढवते.

जंक फूड आणि मद्यपान :

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रात्री काम करणारे हे दिवसा काम करणाऱ्यांपेक्षा जास्त जंक फूड आणि मद्यपानाचे सेवन करतात. जिथे दिवसा काम करणारे फळं, कोशिंबीर, सॅलड किंवा कडधान्य खातात तिथे रात्री काम करणारे नमकीन स्नॅक्स, चिवडा, फरसाण, पिझ्झा, बर्गर, कोला खाण्याला प्राधान्य देतात. ज्यामुळे डायबिटीज, स्थूलता, हाय ब्लड प्रेशर हा धोका वाढतो.

उपाययोजना :

जर नाईट शिफ्ट असेल तर ती शिफ्ट दिवसामध्ये बदलून घेण्यासाठी प्रयत्न करा. जर हे शक्य नसेल तर नाईट शिफ्टच्या दरम्यान मध्येमध्ये ब्रेक घेत रहा. झोप घालवण्यासाठी चहा किवा कॉफीचे सेवन रात्री करू नका. रोज व्यायाम करा व खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.


Edited By – Tanvi Gundaye

.

Manini