Monday, January 20, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : पाळीदरम्यान रक्ताच्या कमतरतेची ही आहेत लक्षणे

Health Tips : पाळीदरम्यान रक्ताच्या कमतरतेची ही आहेत लक्षणे

Subscribe

मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्यातून महिलांना जावं लागतं. प्रत्येक महिलेला पाळीच्या क्रियेला सामोरे जावे लागते. काही महिलांना पाळीदरम्यान लाइट ब्लीडिंग होते. कधीकधी असं होणं नॉर्मल असतं परंतु बराच काळ जर असं होत असेल तर हे चिंतेचं कारण असू शकतं.

लाइट ब्लीडिंगचे कारण :

मासिक पाळीदरम्यान लाइट ब्लीडिंगचे सामान्य कारण म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन असणं आहे. हार्मोन जसे की एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन मासिक पाळीला नियंत्रित करत असतात. यात जरा गडबड झाली तरी त्याचा परिणाम रक्तप्रवाहावर होऊ शकतो. एस्ट्रोजेनच्या कमी प्रमाणामुळे गर्भाशयातील रक्ताचा स्तर पातळ होऊ शकतो. ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान कमी ब्लीडिंग होऊ शकतं.

जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तरीदेखील तुमच्या मासिक पाळीदरम्यान तुम्हाला बदल झालेला दिसून येईल. या गर्भनिरोधक गोळ्या साधारण ओव्युलेशनला दाबून गर्भाशयाचा स्तर पातळ करतात. यामुळे मासिक पाळी कधीकधी मिसदेखील होऊ शकते.

जेव्हा महिलांचे वय मेनोपॉज जवळ पोहोचते तेव्हा यादरम्यान त्यांच्या हार्मोन्सचा स्तर कमी होतो. यामुळेदेखील कमी ब्लीडिंग होऊ शकते.

थायरॉइड ग्रंथी शरीरातील मेटाबॉलिझम आणि हार्मोन्सच्या उत्पादनांना नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हायपरथायरॉयडिझ्म आणि हायपोथायरॉएडिझ्म हे दोन्ही मासिक पाळी अनियमित होण्याचं कारण बनू शकतात. यांच्यामुळे देखील कमी ब्लीडिंग होऊ शकते.

उपाययोजना :

तुमचा आहार हा परिपूर्ण असायला हवा. त्यात योग्य प्रमाणात प्रथिने, खनिजे आणि पोषकतत्त्वं हवीत.

ब्लीडिंग वाढण्यासाठी पपई, खजूर, हळदीचे दूध, बडीशेप या पदार्थांचे सेवन तुम्ही करु शकता.

अधिक उपचारांसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


Edited By – Tanvi Gundaye

Manini