जेवण अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करत असतो. जसे की दूध, दही, मलई किंवा अनेक प्रकारचे मसाले. हे सर्व पदार्थ जेवणाचा स्वाद वाढवतात याबद्दल काहीच दुमत नाही. परंतु हे जाणून घेणे गरजेचे आहे की हे पोटासाठी योग्य आहेत की नाहीत. अनेक वेळा आपण अजाणतेपणाने चुकीच्या गोष्टी एकत्र खातो ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम पडू शकतो.
आज आपण अशाच एका कॉम्बिनेशनविषयी जाणून घेणार आहोत. ते कॉम्बिनेशन म्हणजे दही आणि कांदा. व्हेज असो किंवा नॉनव्हेज, दही आणि कांदा यांच्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. कांदा आणि दही खाण्याचे अनेक फायदे असतात पण हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे खरंच नुकसानदायक आहे का याबद्दल जाणून घेऊयात.
जाणून घेऊयात दही आणि कांदे एकत्र खाल्ल्यास काय होतं याबद्दल.
कांदे आणि दही यांची प्रकृती :
दही आणि कांदे यांची प्रकृती वेगवेगळी असते. कारण कांद्याची प्रकृती गरम आणि दह्याची प्रकृती थंड असते. यामुळेच दही आणि कांदे एकत्र खाऊ नयेत.
फर्मेंटेशन प्रोसेस :
दह्यामध्ये प्रोबायोटिक असतात जे लॅक्टोज आणि दुसरे कंपाऊंडस् तोडण्यास मदत करू शकतात. कांद्यामध्ये फायबर आणि सल्फर चांगल्या प्रमाणात आढळतात.जे या प्रक्रियेला प्रभावित करतात. अशात व्यक्तीला पचनाशी जोडलेल्या समस्या निर्माण होऊ शकतात.
गॅसची समस्या :
दही व कांदा एकत्र खाल्ल्यास पोटातील गॅस आणि अॅसि़डीटीची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला आधीपासूनच गॅसची समस्या असेल तर दही आणि कांदे यांचे एकत्र सेवन करू नका. या दोघांचे एकत्र सेवन करू नये. या दोघांचे कॉम्बिनेशन तुमची चिंता अधिकच वाढवू शकेल.
न्यूट्रिएंटस शरीरात अॅब्जॉर्ब करण्याची समस्या :
कांद्यामध्ये सल्फर असते जे दह्यात असलेले कॅल्शिअमसारखे पोषकतत्त्व शोषून घेण्यापासून शरीराला रोखते.
आयुर्वेद :
आयुर्वेदानुसार, दही आणि कांदे यांची प्रकृती एकमेकांच्या विरूद्ध असल्यामुळे यांना एकत्र खाऊ नये.याशिवाय हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात वात आणि कफ वाढू शकतो. अशात काही लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. खरंतर दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने जर कोणताच त्रास होत नसेल तर तुम्ही हे पदार्थ एकत्र खाऊ शकता.
हेही वाचा : health Tips : दह्यासोबत खाऊ नयेत हे पदार्थ
Edited By – Tanvi Gundaye