Monday, March 17, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : वेट मेंन्टेन ठेवायचंय? मग डिनरनंतर फॉलो करा या सवयी

Health Tips : वेट मेंन्टेन ठेवायचंय? मग डिनरनंतर फॉलो करा या सवयी

Subscribe

प्रत्येकालाच सडपातळ आणि निरोगी राहायचे असते. यासाठी योग्य आहार आणि व्यायामासोबतच काही सवयी पाळणे देखील महत्त्वाचे आहे. याचा परिणाम तुमच्या शरीराच्या पचनशक्तीवर आणि वजन कमी करण्यावर होत असतो. बदलती लाइफस्टाइल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढत चालले आहे. यावर कंट्रोल मिळवणे ही अनेकांना कठीण गोष्ट वाटते. जर तुम्हाला सडपातळ राहायचे असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतरच्या सवयींकडेही लक्ष द्यायला हवे. यामुळे तुम्हाला वाढत्या वजनापासूनही मुक्ती मिळेल आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकेल. रात्रीच्या जेवणानंतर कोणत्या सवयी पाळल्या पाहिजेत ते आजच्या लेखात पाहूयात.

शतपावली करा:

Health Tips Want to maintain weight? Then follow these habits after dinner

रात्रीच्या जेवणानंतर, केवळ 10 ते 15 मिनिटांसाठी साधारण गतीने चालण्याची सवय शरीराला लावा. या सवयीमुळे तुमचे पचन सुधारते आणि शरीरातील पचनक्रिया गतिमान होते. जेवणानंतर हलके चालल्यामुळे अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यासदेखील मदत होते. चालत असल्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीत देखील सुधारणा होऊ शकते, ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होऊ शकते.

स्नॅकिंग टाळा :

Health Tips Want to maintain weight? Then follow these habits after dinner

बऱ्याचदा लोकांना रात्रीच्या जेवणानंतर हलके नाश्ता खाण्याची सवय असते, परंतु यामुळे वजन वाढू शकते. रात्री शरीरातील पचन प्रक्रिया मंदावलेली असते. जर तुम्हाला जेवल्यानंतर भूक लागली असेल तर काही निरोगी पदार्थ जसे की ड्रायफ्रूट्स खा. रात्रीच्या जेवणानंतर तेलकट पदार्थ खाऊ नका. याशिवाय, रात्रीच्या जेवणानंतर साखरयुक्त पदार्थ खाऊ नका. साखरेमुळे कॅलरीजची संख्या वाढू शकते आणि झोपेमध्येही अडथळा निर्माण होऊ शकतो. स्वतःला शारीरिकदृष्ट्या देखील सक्रिय ठेवा.

स्क्रीन टाइम कमी करा :

Health Tips Want to maintain weight? Then follow these habits after dinner

रात्रीच्या जेवणानंतर तुमच्या शरीराला पुरेशी विश्रांती घेणे महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी जास्त स्क्रीन टाइम (मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्ही) टाळा. कारण त्यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. गाढ आणि चांगली झोप तुमच्या शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, जे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी गॅझेट्स वापरू नका.

हेही वाचा : Beauty Tips : डॅंड्रफ आणि हेअर फॉलवर हेअर स्टीम बेस्ट


Edited By – Tanvi Gundaye

Manini