शरीर निरोगी ठेवायचे असेल तर सकस आहार घेणे खूप गरजेचे आहे. हिवाळ्यात निरोगी राहणे आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत लोक आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ज्यूस, सूप आणि अनेक पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करतात. यातून अनेक फायदे मिळतात, पण एक गोष्ट अशी आहे जी सकाळी खाल्ल्यास तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहू शकता. ते म्हणजे सुका मेवा. सुक्या मेव्याशिवाय दुसरं काही नाही. सुक्या मेव्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. अनेकांना सकाळी भिजवलेले बदाम खायला आवडतात तर काहीजण काजू, बदाम आणि पिस्ता एकत्र खातात. हे आपल्या शरीराला आवश्यक पोषण पुरवतात. यामुळे आपले शरीर चपळ होते आणि आपल्याला दिवसभर उत्साही वाटते.
आज आम्ही तुम्हाला अक्रोड आणि खजूर एकत्र खाण्याचे फायदे (हेल्थ बेनिफिट्स) सांगणार आहोत. हे एकत्र खाल्ल्यास अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. हे खूप चविष्ट देखील लागतात. जाणून घेऊया त्यांच्या या फायद्यांबद्दल –
खजूर खाण्याचे फायदे :
खजूरमध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी6 भरपूर प्रमाणात आढळतात. हे खाल्ल्याने आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते. यामुळे आपली हाडे आणि स्नायू मजबूत होतात. खजुरांमध्ये पोटॅशियमची पातळी खूप जास्त असते जी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याशिवाय खजुरांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते . बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासही हे उपयुक्त आहे.
अक्रोड खाण्याचे फायदे :
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम यासारखे आवश्यक पोषक घटक असतात. यामुळे मेंदू निरोगी राहतो. हे खाल्ल्याने आपले हृदयही निरोगी राहते. यामध्ये असलेले घटक तुम्हाला तरुण ठेवतात. अक्रोडमध्ये फायबर देखील चांगल्या प्रमाणात आढळते, जे पचन सुधारते आणि पचनसंस्था देखील मजबूत करते. अक्रोड खाल्ल्याने भूकही कमी लागते. या कारणास्तव, हे वजन कमी करण्यासाठी देखील आदर्श मानले जाते.
अक्रोड आणि खजूर एकत्र खाण्याचे फायदे :
अक्रोड आणि खजूर एकत्र खाल्ल्याने ऊर्जा वाढते, स्नायू मजबूत होतात आणि हृदय निरोगी राहते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आपल्याला चिरतरुण ठेवतात. जर आपण रोज खजूर आणि अक्रोड एकत्र खाण्याची सवय लावली तर त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते. एकंदरीत, हे केवळ आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्त्वेच पुरवणार नाही तर आपले आरोग्य सुधारण्यास देखील मदत करेल.
हेही वाचा : Gardening Tips : घरीच बनवा टोमॅटोच्या रोपासाठी खत
Edited By – Tanvi Gundaye