Tuesday, January 7, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : मैद्याचे पदार्थ का खाऊ नयेत?

Health Tips : मैद्याचे पदार्थ का खाऊ नयेत?

Subscribe

मैदा हा आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे बोलले जाते. कधीकधी मैद्यासारखे पीठ आतड्यांना चिकटते असेही म्हणतात. या समजुतीबद्दल नेमकं तथ्य काय आहे आणि मैद्याचे पदार्थ का खाऊ नयेत याविषयी जाणून घेऊयात. गेल्या काही वर्षात, लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे आणि ते निरोगी खाण्याच्या सवयींकडे वळले आहेत, परंतु मधल्या का काही खाद्यपदार्थांशी संबंधित अनेक गैरसमजदेखील पसरले आहेत. पचनक्रियेत फायबर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र याच फायबरचे प्रमाण मैद्याच्या पिठात कमी असते.

पीठ आतड्यांमध्ये चिकटते का?

आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की जास्त प्रमाणात मैदा खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते, जर जास्त मैदा खाल्ला तर तो पोटाला चिकटतो. पण सत्य हे आहे की पीठ पोटाला किंवा आतड्याला चिकटत नाही. आपण पीठ कच्चे खात नसून ते शिजवलेले खात असल्याने ते आपल्या पचनसंस्थेमध्ये सहजपणे सामावून जाते आणि साध्या कार्बोहायड्रेट्सच्या रूपात शोषले जाते.

- Advertisement -

पचनसंस्थेसाठी पीठ चांगले असते का ?

खरंतर पीठ आतड्याला चिकटते हा दावा वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. तसं पाहायला गेलं तर पिठात फायबरची कमतरता असते. पीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

फायबरची कमतरता :

मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. आपल्या पचनसंस्थेसाठी फायबर खूप महत्वाचे आहे. हे पचन व्यवस्थित करते आणि बद्धकोष्ठतासारखी समस्या टाळते . त्यामुळे जास्त प्रमाणात पीठ खाल्ल्याने फायबरची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि अपचन सारख्या समस्या निर्माण होतात.

हाय कॅलरीज् :

मैद्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, परंतु त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखी इतर पोषक तत्वे फारच कमी असतात. म्हणूनच मैद्याला हाय कॅलरी फूड
म्हणतात. जास्त प्रमाणात पीठ खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो .

रक्तातील साखरेची पातळी:

पिठात असलेले कार्बोहायड्रेट्स खूप लवकर पचतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप हानिकारक असू शकते.

हेही वाचा : Fashion Tips : डिनर डेटसाठी परफ्केट लॉन्ग ड्रेसेस


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini