Health Tips : प्रसूतीनंतर महिलांनी खिचडी का खावी?

प्रसूतीनंतर स्त्रीयांना फक्त आणि फक्त पौष्टिक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रसूतीनंतर स्त्रीयांचे शरीर थोडे थकलेले आणि कमजोर झालेले असते, त्यामुळे पौष्टिक अन्नाचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरालतील कमजोरी दूर होऊन शरीराला पुरेशी ताकद मिळते. तसेच प्रसूतीनंतर पचनक्रियेला थोड्या आरामाची गरज असते. त्यामुळे डॉक्टरांकडून साधे हलके अन्न खाण्यास सांगितले जाते.

अनेक स्त्रीयांनी ऐकले असेल की, प्रसूतीनंतर खिचडी किंवा इतर हलके अन्न खाणे शरीरासाठी चांगले असते. परंतु असा सल्ला देण्यामागे नक्की काय कारण आहे आणि याचे काय फायदे आहेत?

प्रसूतीनंतर खिचडी का खावी?

एक्सपर्टच्या मते खिचडीमध्ये खूप जास्त प्रोटीन असते, तसेच खिचडी पचायला सुद्धा हल्की असते. प्रसूतीनंतर शरीर खूप कमजोर झाले असल्याने ते जड अन्न पचवू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर प्रसूतीनंतर खिचडी खाण्याचा सल्ला देतात.

खरंतर खिचडीमध्ये आपण अनेक पौष्टिक धान्य, भाज्या टाकतो. एका खिचडीमध्ये आपल्याला अनेक पोषक पदार्थ मिळतात. यातील कार्बोहाइड्रेट्स आणि काही प्रोटीन असतात. प्रसूतीनंतर पूर्ण रिकवर व्हायला अनेक प्रकारचे पोषकतत्व हवे असतात. ही पोषकतत्व ब्रेस्टमिल्कच्या माध्यमातून बाळापर्यंत पोहोचतात.

डॉक्टर सांगतात की, प्रसूतीनंतर स्त्रीयांना आहारात जास्त प्रोटीन घ्यायला हवे. यावेळी राजमा किंवा उडीदाची डाळ खाऊ नये. आहारात भाज्या, भाकरी आणि दह्याचा वापर करा. तसेच ३ ते ४ लीटर पाणी प्या.

 


हेही वाचा :Health Tips : जेवल्यानंतर चुकूनही करू नका अंघोळ; नाहीतर होतील गंभीर परिणाम