बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेले बिघाड यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढला आहे. परिणामी, 20 वर्षांखालील लोकही हाय बीपी, मधुमेह इत्यादी अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडत आहेत. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ सर्वांना त्यांच्या आरोग्याची सतत काळजी घेण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की पुरुषांपेक्षा महिलांना काही आजारांचा धोका जास्त असतो? संशोधनानुसार असं समोर आलं आहे की महिलांना ज्या आजारांचा धोका पुरूषांपेक्षा अधिक असतो त्यातील प्रमुख समस्या ही न्यूरोलॉजिक्सशी संबंधित आहे. न्यूरोलॉजिकल समस्या म्हणजे मज्जासंस्थेशी संबंधित रोग जे मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जातंतूंवर परिणाम करतात. यामुळे, तुम्हाला अशक्तपणा, अर्धांगवायू आणि संवेदना कमी होणे यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महिलांमध्ये याचा धोका अधिक का असतो हे जाणून घेऊया.
हार्मोनल बदल :
महिलांना पुरुषांपेक्षा हार्मोनल बदलांचा धोका जास्त असतो. हार्मोनल इंम्बेलेन्स किंवा हार्मोन्सच्या पातळीत होणारे बदल यांमुळे न्यूरोलॉजिकल स्थिती देखील बदलू लागते. उदाहरणार्थ, मासिक पाळी, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती दरम्यान स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी अनेक वेळा बदलते.
इस्ट्रोजेन हार्मोन महिलांच्या लैंगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचा मेंदू, हाडे, त्वचा, केस आणि इतर अवयवांवरही परिणाम होतो. मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान इस्ट्रोजेन असंतुलनामुळे महिलांना मायग्रेन होण्याची शक्यता असते.
स्त्रियांमध्ये अल्झायमर रोगाचा धोका:
संशोधनानुसार, स्त्रियांना देखील अल्झायमर रोगाचा धोका जास्त असतो. जगभरात अल्झायमर आजाराने ग्रस्त असलेल्या दोन तृतीयांश रुग्ण या महिला आहेत. हार्मोनल चेंज हे देखील याला कारण आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की इस्ट्रोजेन हार्मोन हे अल्झायमर रोगाच्या प्रभावापासून शरीराचे रक्षण करते, परंतु स्रियांच्या रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना या विकाराचा धोका वाढतो.
न्यूरोलॉजिकल समस्या कशा टाळायच्या?
आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 50-55 वर्षांच्या स्त्रियांना त्यांच्या रजोनिवृत्तीनंतर अधिक न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे लहानपणापासूनच काही गोष्टींची काळजी घेतली गेली तर भविष्यात हा धोका कमी होऊ शकतो.
यासाठी संतुलित आहार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. अधिक प्रमाणात पालेभाज्या, मासे, नट आणि अँटिऑक्सिडंट्स असलेले पदार्थ खायला हवेत. याशिवाय शारीरिक हालचाली आणि नियमित योगासने केल्याने मेंदूतील रक्ताभिसरण सुधारण्यास आणि न्यूरोलॉजिकल विकारांचा धोका कमी होण्यास मदत होते, त्यामुळे दररोज व्यायाम केला पाहिजे. भविष्यात या समस्या टाळण्यासाठी तणाव व्यवस्थापन आणि चांगली झोप घेणे देखील आवश्यक आहे.
हेही वाचा : Peronal Loan Precautions : पर्सनल लोन घेताना या बाबींकडे द्या लक्ष
Edited By – Tanvi Gundaye