Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenReceipe : हेल्दी आणि क्रिस्पी नाचणीचे चिप्स

Receipe : हेल्दी आणि क्रिस्पी नाचणीचे चिप्स

Subscribe

अलीकडे लहान मुलं मोठ्या प्रमाणात बाजारीत चिप्स खाणं पसंद करतात. मात्र कधी कधी बाहेरचं जास्त खाल्ल्याने शारीरिक त्रास निर्माण होऊ शकतो. अशावेळी तुम्ही घरच्या घरी पौष्टिक नाचणीच्या पीठापासून चटपटीत चिप्स तयार करू शकता.

साहित्य :
 • 1 वाटी नाचणीचं पीठ
 • 1/4 वाटी गव्हाचं पीठ
 • 1 लहान चमचा लाल मिरची पावडर
 • 1 लहान चमचा चाट मसाला
 • मीठ चवीनुसार
 • पाणी (पिठ मळण्यासाठी)
 • तेल
 • मायक्रोवेव्ह
 • बेकिंग ट्रे
कृती :

Buy crispy Nachani Chips Online – Neelam Foodland

- Advertisement -

 

 • सर्वप्रथम एका भांड्यात नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ, लाल मिरची पावडर, एक चमचा तेल टाकून पाण्याने मळून घ्या.
 • मळलेल्या पीठाला 10-15 मिनिट झाकून ठेवा.
 • 10-15 मिनिटानंतर मळलेल्या पीठाचे लहान-लहान गोळे करून घ्या.
 • आता ते गोळे चपाती प्रमाणे लाटून घ्या आणि चाकूच्या मदतीने शंकरपाळी प्रमाणे त्याचे काप करा.
 • एका ब्रशच्या मदतीने या कापलेल्या कापांवर तेल लावून घ्या.
 • आता, मायक्रोवेव्ह 180 अंश सेंटीग्रेडवर 10 मिनिट प्री-हीट करून बेकिंग ट्रेला ग्रीस करू त्यावर कापलेले सर्व काप बेक करा.
 • पहिले 7-8 मिनिटे एका बाजूने बेक करून घ्या आता मायक्रोवेव्ह उघडून दुसऱ्या बाजूने 7-8 मिनिट बेक करून घ्या. वेळ पूर्ण झाल्यानंतर मायक्रोवेव्ह बंद करून ठेवा.
 • तयार झालेले नाचणीचे काप मसाल्यासोबत मिक्स करून सर्व्ह करा.

हेही वाचा :

Receipe : काबुली चन्याचे टेस्टी कबाब

- Advertisment -

Manini