Sunday, February 18, 2024
घरमानिनीKitchenहेल्दी अ‍ॅण्ड टेस्टी लसणाचं सूप

हेल्दी अ‍ॅण्ड टेस्टी लसणाचं सूप

Subscribe

हिवाळ्यात लसणाचं सूप अवश्य प्यावे. लसूण उ्ष्ण असल्याने थंडीत लसणाचं सूप पिल्यास सर्दी खोकला , सांधेदुखीपासून आराम मिळतो.

साहित्य :

 • 2 चमचे आलं लसूण बारीक चिरलेले
 • 2 चमचे गाजराचे बारीक तुकडे
 • 2 चमचे हिरवा वाटाणा
 • 2 चमचे मक्याचे दाणे
 • 2-3 चमचे बारीक चिरलेला कोबी
 • 1 चमचा तेल
 • चवीपुरते मीठ
 • 1 चमचा कॉर्न फ्लॉवर
 • 1 चमचा ठेचलेला लसूण

कृती :

Garlic Broth | Recipes | Dr. Weil's Healthy Kitchen

- Advertisement -
 • सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. नंतर त्यात आलं लसून टाका.
 • गाजर, वाटाणा, मक्याचे दाणे,कोबी टाका आणि व्यवस्थित परतून घ्या.
 • नंतर त्यात पाणी आणि मीठ टाका आणि त्यावर ठेचलेला लसूण टाका.
 • हे मिश्रण भाज्या शिजेपर्यंत चांगल उकळवून घ्या.
 • त्यात कॉर्न फ्लॉवर टाका आणि गरमा गरम सर्व्ह करा.

 


हेही वाचा :

Recipe : हेल्दी पालक स्वीट कॉर्न सँडविच

- Advertisment -

Manini