सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील आपल्या ऊर्जेचा आधार असतो. हा केवळ आपल्याला दिवसभर सक्रिय ठेवत नाही तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करतो. अशा परिस्थितीत, जर आपल्या नाश्त्यामध्ये आपण कडधान्यांचा समावेश केला तर हा आपल्यासाठी ऊर्जा आणि पोषणतत्त्वे यांचा उत्तम स्रोत ठरू शकतो.
स्प्राउट्स, ज्याला मोड आलेली कडधान्यं देखील म्हटले जाते. त्यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे पचायला सोपे असतात आणि तुम्हाला यामुळे पोट भरलेलेही वाटते. त्यामुळे ते रोज खाल्ल्याने निरोगी राहण्यास मदत होते. आपण नाश्त्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या कडधान्यांचा समावेश करू शकतो याविषयी जाणून घेऊयात.
मूग डाळ स्प्राउट्स :
मूग स्प्राउट्स प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहेत. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया अधिक सुलभ होते आणि पचनसंस्था अधिक निरोगी राहते. उकडलेल्या मूगामध्ये हलके मीठ, काळी मिरी आणि लिंबू घालून खा.
काळे चणे :
काळ्या हरभऱ्यामध्ये लोह, फोलेट आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. यामुळे स्नायू मजबूत होतात, अशक्तपणा जातो आणि शरीरातील ऊर्जाही अधिक वाढते .तुम्ही मोड आलेले काळे चणे उकडून त्यात थोडे जिरे आणि लिंबू घालून खाऊ शकता.
सोयाबीन स्प्राउट्स :
सोयाबीन स्प्राउट्समध्ये उच्च प्रथिने आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात. स्नायू तयार करणे, संप्रेरक संतुलन आणि मानसिक आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. ते सॅलडमध्ये घाला.
अल्फाल्फा स्प्राउट्स :
हलके आणि कुरकुरीत अल्फाल्फा स्प्राउट्स म्हणजेच मेथीचे दाणे. हे दाणे अ, क आणि के जीवनसत्त्वांनी समृध्द असतात. यामुळे त्वचा चमकते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते . ते तुम्ही सँडविच किंवा सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता.
मुळा भाजीच्या बिया :
मुळा स्प्राउट्स व्हिटॅमिन सी आणि डिटॉक्स गुणधर्मांनी समृद्ध असतात. ते शरीर स्वच्छ करतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात. ते लिंबू आणि हिरवी मिरची सोबत खाणे फायदेशीर ठरू शकते.
गव्हाच्या बिया :
गव्हाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, बी आणि फायबर असते. हे त्वचेला चमक देते, पचनक्रिया सुधारते आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देण्याचे काम करते.
मसूर डाळ :
मसूर स्प्राउट्स प्रोटीन्स आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहेत. हे हृदय निरोगी ठेवते, वजन कमी करण्यास मदत करते आणि हे खाल्ल्याने एखाद्याला दीर्घकाळ भूकही लागत नाही.
न्याहारीत कडधान्यांचा समावेश कसा कराल ?
तुम्ही कोंब आलेले, कच्चे, उकडलेले स्प्राउट्स सॅलडच्या स्वरूपात किंवा चाट बनवून खाऊ शकता. त्यात लिंबू, टोमॅटो, हिरवी मिरची, धणे आणि मसाले मिसळा.
स्प्राउट्सचे नियमित सेवन केल्याने तुम्ही निरोगी, ऊर्जावान आणि तंदुरुस्त राहू शकता. त्यामुळेच कडधान्यांना तुमच्या नाश्त्याचा भाग बनवा.
हेही वाचा : Health Tips : ऑफिसमध्ये असा वा घरी, लंचनंतर किती पाऊलं चालावी?
Edited By – Tanvi Gundaye