दिवसेंदिवस मुंबईतील उष्णता वाढत असून आरोग्याच्यादृष्टीने खूप मोठी समस्या होत चालली आहे. अशा परिस्थितीत शरीरात उष्णता वाढते आणि अनेक शारीरिक तक्रारी सुरू होतात. या तक्रारी जाणवू नये यासाठी स्वत:ला हायड्रेट ठेवणे आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. आहारतज्ञही उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी शरीर थंड ठेवतील असे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. कारण या पदार्थाच्या सेवनाने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मदत होते. चला तर मग आजच्या लेखातून जाणून घेऊयात पोटातील उष्णता कमी करणारे पदार्थ
बेलफळाचे सरबत –
बेलफळ हे एक नैसर्गिक हायड्रेंटिग पेय आहे. या पेयामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यात टॅनिन, फ्लेव्होनाइड्स, कौमरिन सारखी पोषकतत्वे आढळतात. या पोषकतत्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण मिळते आणि शरीर हायड्रेट राहते.
हंगामी फळे –
उन्हाळ्यात हंगामी फळे जरूर खावीत. यात ऍटी-ऑक्सिडंट आढळतात. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारी पोटातील उष्णता कमी होते.
दहीभात –
दही थंड असल्याने उन्हाळ्यात आहारात याचा समावेश करावा. दह्याच्या सेवनाने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
भिजवलेले बदाम –
उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी तुम्ही भिजवलेले बदाम खावेत. बदाम मेंदूला तीक्ष्ण तर राखतेच शिवाय त्वचा आणि नखांचेही संरक्षण करते.
ताक –
दुपारच्या जेवणात एक ग्लास ताक पिण्याची सवय करावी. ताकातील प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पोटाच्या समस्या उद्भभवत नाही.
गुळपाणी –
रात्रीच्या जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी गुळाचे पाणी प्यावे. गुळात आम्लता कमी करणारे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे पोटातील उष्णता कमी होते.
हेही पाहा –