शरिरास थंडावा देणारी लाभदायक शीतपेय

उसाचा रस, लिंबाचे, कोकमाचे सरबत, पन्हे, नीरा, चिंचेचे पन्हे, जलजिरा असे अनेक नैसर्गिक पदार्थ पिणे लाभदायक असते.

शरिराला थंडावा देणारे अत्यंत उपयुक्त असे शीत पेय घरच्या घरी बनवता येतात. त्या पेयांनी शरिरास थंडावा मिळण्यास मदत होते. उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते. त्यामुळे काही शीत पेयांमुळे शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत होते. उसाचा रस, लिंबाचे, कोकमाचे सरबत, पन्हे, नीरा, चिंचेचे पन्हे, जलजिरा असे अनेक नैसर्गिक पदार्थ पिणे लाभदायक असते.

जलजिरा

जिरा पूड, आले, काळे मीठ, पुदिना, आमचूर पूड इत्यादी अनेक पदार्थ कमी-जास्त प्रमाणात त्यात वापरून जलजिरा बनवले जाते. जलजिऱ्यामुळे शरीराला थंडावा मिळून शरीरातली उष्णताही कमी होते. पचनाच्या तक्रारी दूर होऊन अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा हे पेय घेतले जाते.

कोकम सरबत

चवीला उत्तम असणारे कोकम सरबत आणि आरोग्यासाठी फायदेशी ठरणारे कोकम याचा वापर उन्हाळ्यात सर्रास वापर केला जातो. कोकम सरबतामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच पण त्याचबरोबर पित्ताच्या सर्व तक्रारी दूर होतात. तसेच शरिरावर अ‍ॅलर्जी झाल्यास कोकम फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे हायड्रॉक्सिसिट्रिक अ‍ॅसिड या द्रव्यामुळे चरबी शरीरात साठण्यास अटकाव होत असल्याने वजन आटोक्यात राहते. बाजारामध्ये जे कोकम सरबत मिळते त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वजनाला अनुसरून सरबत घेण्याची पद्धत बदलावी किंवा घरच्या घरी अगळ आणूनही सरबत करता येते.


सावधान! गोड पेय पदार्थांमुळेही वाढतेय वजन