Dengue: डेंग्यूची लागण झाल्यास करा ‘या’ पदार्थांचे सेवन

डेंग्यूची लागण झाल्याने शरीर प्रचंड कमजोर होते. त्यामुळे या काळात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागले.

Healthy food diet for Dengue patients
Dengue: डेंग्यूची लागण झाल्यास करा 'या' पदार्थांचे सेवन

देशात एकीकडे कोरोनाचा कहर कमी होत आहे तर दुसरीकडे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दरम्यानच्या काळात वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. जुलै ते ऑक्टबर महिन्यात डेंग्यूची लागण होण्याची सर्वाधिक लक्षणे असतात. डेंग्यू,मलेरिया सारख्या आजारांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागले. त्यामुळे या दिवसात आपला आहार अगदी योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या डाएटमध्ये काही महत्त्वाचे पदार्थ असणे अत्यंत गरजेचे आहे. जाणून घ्या डेंग्यूची लागण झाल्यास रुग्णांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.

डेंग्यू हा आजार डास चावल्याने होतो. डेंग्यूची लागण झाल्याने शरीर प्रचंड कमजोर होते. त्यामुळे या काळात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागले. या काळात संतुलित आहार आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते.

पपई

डेंग्यूची लागण झाल्यास पपईच्या पानांचा रस काढून तो पिणे आरोग्यदायी मानले जाते. पपईच्या पानांमुळे शरिरातील पांढऱ्या पेशी वाढण्यास मोठी मदत होते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात एंटीऑक्सिडेंट, अमीनो अॅसिड, एंजाइम, व्हिटामीन सी आणि इतर अनेक आवश्यक घटक असतात. ज्यामुळे आपले शरिर हायड्रेट राहते तसेच रक्ताभिरण देखील वाढते.

व्हेजिटेबल ज्यूस

 

विविध भाज्यांचा रस डेंग्यू झालेल्या रुग्णांसाठी कधीही उत्तम. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स, मिनरल्स असतात. ज्यामुळे आपले शरिर हायड्रेड राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हर्बल टी

डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये प्रचंड थकवा असतो. रुग्णांना हालचाल करणे देखील कठीण होऊन बसते. अशावेळी रुग्णाला हर्बल टी देणे उत्तम. यामुळे शरिराला आराम मिळतो तसेच ताजेतवाणे देखील वाटते. हर्बल टीची चव वाढवण्यासाठी त्यात वेलची किंवा आले घालू शकता.


हेही वाचा – कूल कूल थंडीत प्या हॉट लसणाचं सूप