थंडीच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या दिवसातील बदलते वातावरण अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे शक्य होईल तितके शरीर उबदार ठेवावे असा सल्ला तज्ञ देतात. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि सर्दी-खोकल्यासारखे आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही हेल्दी लाडूंचे सेवन करायला हवे. या लाडूंच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते. त्यामुळे जाणून घेऊयात, शरीराला उबदार ठेवण्यासाठी कोणत्या लाडूंचे सेवन तुम्ही करायला हवे,
डिंक –
डिंकाचे लाडू कॅल्शियम, प्रोटिन्स आणि अॅंटी-ऑक्सिडंटने परिपूर्ण असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात आवर्जून डिकांचे लाडू खावेत असा सल्ला दिला जातो. डिंकाच्या लाडूच्या सेवनाने शरीर तर उबदार राहतेच शिवाय हाडे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
सुक्या खोबऱ्याचे लाडू –
सुक्या खोबऱ्याचे लाडू थंडीच्या दिवसात शरीराला उबदार ठेवतात. यातील प्रोटीन्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम शरीराला निरोगी ठेवतात. त्यामुळे थंडीपासून होणाऱ्या संसर्गापासून दूर राहायचे असेल तर सुक्या खोबऱ्याचे लाडू अवश्य खायला हवेत.
तिळ –
तीळ आणि गुळ शरीराला उबदार ठेवण्यासाठी योग्य पदार्थ आहेत. त्यामुळे या दिवसात तिळगुळाचे लाडू खाणे फायदेशीर ठरेल. या लाडूच्या सेवनाने रक्ताभिसरण सुधारते आणि हाडेही मजबूत होतात.
ड्रायफुट्स –
ड्रायफुट्सचा लाडू खाल्यानेही शरीर उबदार ठेवता येते. डॉक्टर सुद्धा या दिवसात डायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे ड्रायफुट्स खाण्याऐवजी तुम्ही त्यापासून लाडू बनवून खाऊ शकता.
भाजलेल्या चण्यांचे लाडू –
भाजलेल्या चण्यांचे लाडू शरीरासाठी आरोग्यवर्धक असतात. त्यामुळे आवर्जून थंडीच्या दिवसात भाजलेल्या चण्यांचे लाडू तुम्ही खायला हवेत. भाजलेल्या चण्यांमध्ये भरपूर पोषकतत्वे आढळतात, जे शरीर निरोगी ठेवतात आणि तुम्ही सारखे आजारी पडत नाही.
मेथीचे लाडू –
मेथीचे दाणे शरीर उबदार ठेवतात. मेथीच्या दाण्यांमध्ये पौष्टिक घटक शरीराला निरोगी ठेवतात. खरं तर, मेथीचे लाडू कडवट असतात. त्यामुळे अनेकांना हे लाडू आवडत नाही. पण, शरीरासाठी नियमित या लाडूचे सेवन करणे फायदेशीर असते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde