Saturday, April 20, 2024
घरमानिनीमहिलांनी तंदुरुस्त राहण्यासाठी करावीत 'ही' कामं

महिलांनी तंदुरुस्त राहण्यासाठी करावीत ‘ही’ कामं

Subscribe

सध्याच्या बदलत्या युगात महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. या व्यतिरिक्त ती तिच्या खासगी आयुष्यात कोणाचीतरी मुलगी, सून, सासू, आजी अशा विविध भुमिका बजावत असते. महिलांसंदर्भात असे काही मुद्दे आहेत ज्याकडे त्या स्वत: दुर्लक्ष करतात. खासकरुन आरोग्यासंबंधित मुद्दे. जर त्यांनी त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेतली तर निश्चितच दीर्घकाळ त्या फिट राहतील. त्यामुळे महिलांनी तंदुरस्त राहण्यासाठी नक्की कोणती कामं करावीत याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-तणाव कमी करा

- Advertisement -


तज्ञ असे सांगतात की, महिला कोणत्याही कामाचा ताण घेतात. त्याचा थेट परिणाम हा त्यांच्या आरोग्यावर पडतो. करियर असो किंवा जबाबदारी या गोष्टींचा ताण घेणे हे महिलांसाठी सर्वसामान्य आङे. परंतु या ताणावर काही उपाय केले जात नाहीत. अशातच तुम्ही ताणाखाली असाल तर त्यावर घरातील मंडळीशीं, मित्रपरिवाराशी बोलून तोडगा काढा. तणावामुळे एंग्जाइटी आणि हृदय रोगाचा धोका वाढतो. तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि योगाभ्यास सुद्धा करु शकता.

-अधिक पाणी प्या

- Advertisement -


आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे म्हणजे पाणी प्या. शरिराला हायड्रेट ठेवावे असे सांगितले जाते. मानवी शरिर जवळजवळ ६० टक्के पाण्याने तयार झालेले आहे. याचा अर्थ असा की, तुमच्या शरिराचे अवयव किंवा कोशिका उत्तम पद्धतीने काम करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता असते. यामुळे आरोग्य तंदुरस्त राहण्यास ही मदत होते. अधिक पाणी प्यायल्याने संपूर्ण शरिरात ऑक्सिजनची पूर्तता केली जाते.

-पूर्ण झोप घ्यावी


शरिराला पूर्ण झोपेची फार आवश्यकता अशते. कारण तज्ञ असे सांगतात की, झोप ही आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. यामुळे डोक आणि शरिर ही शांत राहते. महिलांमध्ये नेहमीच असे दिसून आले आहे की, त्या घरातील काम, मुलांचा अभ्यास घेणे अशा काही गोष्टींमुळे रात्री उशिरा पर्यंत जागी राहते आणि सकाळी लवकर उठते. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. तज्ञ असे सांगतात की, कमीत कमी ७-८ तासांची झोप घेणे आवश्यक असते.

-हेल्दी फूड खा


ट्रेंडी डाएट आणि जंक फूड खाण्याची प्रत्येकालाच सवय असते. परंतु या गोष्टी शरिराला फार नुकसान पोहचवतात. त्यामुळे पुरुषांसह महिलांना सुद्धा हेल्दी फूड खाण्याचा सल्ला दिला जातो. ताजी फळं, भाज्या, ओट्स अशा गोष्टींचा खाण्यात समावेश करण्यास सांगितले जाते.

-आपल्या शरिराचे ऐका


उत्तम आरोग्यासाठी नेहमीच आपल्या आरोग्याचे ऐकावे. जर तुमचे शरिर तु्म्हाला तुम्ही थकला आहात असा सिग्नल देत असेल तर वेळीच न्युट्रीशन घ्या. असे न केल्यास तुमच्याच आरोग्याचे नुकसान होऊ शकते. यामुळे तुमच्या शरिराला उर्जा मिळणार नाही. पाचनक्रिया बिघडेल.

 


हे देखील वाचा: Womens Tips : ऑफिसला जाणाऱ्या महिलांनी ‘अशी’ घ्यावी त्वचेची काळजी

- Advertisment -

Manini