Friday, March 1, 2024
घरमानिनीKitchenRecipe : फळभाज्यांचे हेल्दी पराठे

Recipe : फळभाज्यांचे हेल्दी पराठे

Subscribe

अनेकदा लहान मुलं गाजर, बीट, दुधी, काकडी या फळभाज्यांचे सेवन करण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही लहान मुलांना सर्व फळभाज्यांचे पराठे करुन दिल्यास लहान मुले आवडीने खातात.

साहित्य :

 • गव्हाचे पीठ (कणीक)
 • बेसन
 • 1 दुधी
 • 2 गाजर
 • 2-3 काकड्या
 • 1 बीट
 • 1 मुळा
 • कोथिंबीर
 • तीळ
 • ओवा-जिरे पूड
 • तिखट
 • हळद
 • चवीपुरते मीठ

कृती :

Mix Veg Paratha Recipe Cooked by Chef Ajay Chopra

- Advertisement -

 

 • सर्वप्रथम एका ताटात गरजेनुसार गव्हाचे पीठ घ्या.
 • त्यात अगदी थोडेसे बेसन घालून ते एकत्र करून घ्या.
 • त्यानंतर त्यामध्ये ओवा-जिरे पूड, तिखट, हळद, तीळ आणि गरजेनुसार मीठ घालून ते पुन्हा व्यवस्थित मिसळून घ्या.
 • नंतर साली काढलेला दुधी, गाजर, काकडी, बीट आणि मुळा हे सर्व बारीक किसणीने किसून घ्या आणि त्यात थोडी कोथिंबीर बारीक चिरून घाला.
 • या सर्व किसलेल्या फळभाज्या गहू, बेसन पिठात घालून ते पुन्हा मिसळून घ्या.
 • गरज असल्यास त्यात थोडे पाणी घालू शकता.
 • आता याची कणी मळून घ्या आणि याचे पराठे लाटून ते छान खरपूस भाजून घ्या.
 • गरमागरम पराठे सॉससोबत सर्व्ह करा.

 हेही वाचा :

Moong Dal Shorba : मुलांसाठी बनवा मुगाचा शोरबा

- Advertisment -

Manini