गुलाबी थंडी आली की, शरीराला उबदार ठेवणारे पदार्थ खावेत असा सल्ला दिला जातो. शरीराला उबदार ठेवण्यासाठी तुम्ही या दिवसात सूप पिऊ शकता. सूप प्यायल्याने केवळ शरीरच निरोगी राहत नाही तर संपूर्ण शरीराला फायदे होतात. विविध भाज्यांपासून सूप बनवले जाते. भाज्यांमधील पोषक घटक शरीर उर्जावान ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. खरं तर सूप प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. शरीर हायड्रेट राहिल्याने शरीराला ताजेतवाने होते आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे जाणून घेऊयात, हिवाळ्यात कोणते सूप प्यायला हवे,
व्हेजिटेबल सूप –
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हेजिटेबल सूप पिणे फायदेशीर ठरेल. तुम्ही मिश्र भाज्यांचे किंवा कोणत्याही भाजीचे सूप बनवून पिऊ शकता.
चिकन सूप –
चिकन सूप प्यायल्याने स्नायू बळकट होतात आणि शरीराला उर्जा मिळते. त्यामुळे आवर्जून या दिवसात चिकन सूप प्यायला हवे.
टोमॅटो सूप –
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आदी पोषक तत्वे असतात. त्यामुळे पोषक तत्वांनी परिपूर्ण असे टोमॅटो सूप प्या. टोमॅटोच्या सूपमध्ये क्रोमियम आढळते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
गाजर सूप –
गाजराचे सूप तुम्ही हिवाळ्यात पिऊ शकता. यासाठी गाजर उकडून घ्या आणि नंतर यात आलं टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या. तयार सूप गाळून प्या, निरोगी राहाल.
मूग डाळीचे सूप –
मूग डाळ प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्ससह अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही मूग डाळीचे सूप पिऊ शकता.
लिंबू-ब्रोकोली सूप –
लिंबू आणि ब्रोकोलीचे सूप हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. ब्रोकोलीमध्ये अॅटी-ऑक्सीडंट आणि फायबर आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde