सध्या लोकांची लाइफस्टाइल फार वेगाने बदलत चालली आहे. खाण्यापिण्याची सवय ते कामकाज करण्याची पद्धत याचा थेट आरोग्यावर परिणाम होत आहे. अशातच लहान वयातच लोकांना काही आजार आणि समस्यांचा सामना करावा लागत आहे. हृदयासंबंधित समस्या सध्या सामान्य झाल्या आहेत.
केवळ वाढतेच वय नव्हे तर आजकाल लहान वयातील मुलांना सुद्धा हृदय विकाराच्या झटक्याचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियात हार्ट अटॅक संबंधित काही व्हिडिओ शेअर केले जातात. त्यात अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो असे दाखवले जाते.
का वाढतोय तरुणांमध्ये हार्ट अटॅकची प्रकरणे?
तरुणांमध्ये वाढत्या हार्ट अटॅकच्या आकडेवारीबद्दल डॉक्टर असे म्हणतात की, ही खरंतर चिंताजनक बाब आहे. त्यांनी असे म्हटले की, आज आपण जे काही पाहतो ते लाइफस्टाइल, चुकीची माहिती आणि बेजबाबदारपणामुळे होत आहे.
कोविडच्या परिस्थितीनंतर आपली काम करण्याचा पॅटर्न बदलला गेला आहे. त्याचा परिणाम आपल्या लाइफस्टाइलवर होत आहे. हाच बदल आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. त्याचसोबत काही रिसर्चमध्ये कोविड आणि हार्ट अटॅकमध्ये संबंध असल्याचे समोर आले आहे. तसेच बिघडलेल्या लाइफस्टाइलसह तणावाबद्दलच्या काही ना काही गोष्टी सोशल मीडियात व्हायरल होत असतात. त्यामुळे कोणत्याही तथ्यांशिवाय उपचार करणे जीवावर बेतू शकते.
हेही वाचा- हृदयविकारापासून वाचण्यासाठी ‘या’ गोष्टी आजपासूनच सोडा