Saturday, February 8, 2025
HomeमानिनीHealth Care Tips : हार्ट अटॅकचा धोका कमी करतात या सवयी

Health Care Tips : हार्ट अटॅकचा धोका कमी करतात या सवयी

Subscribe

धावपळीचे आयुष्य, बदलती लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या हृदयावर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे. यात तरुणांचा समावेश जास्त आहे. अशा परिस्थितीत हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली, संतुलित आहार यासोबत काही योग्य सवयी लावणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात, कोणत्या सवयी हार्ट अटॅकचा धोका कमी करतात.

साखरेपासून दूर राहा –

जास्त साखर आणि जंक फूड हृदयासाठी हानिकारक असते. या पदार्थामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयावर परिणाम होतो.

मद्यपान टाळा –

झोपण्यापूर्वी मद्यपान करू नये. अनेकांना ही सवय असते. पण, दारू, सिगरेट हे आरोग्यासाठी आहेत. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मद्यपानाची सवय बंद करायला हवी.

हलके पदार्थ खावेत –

आवडीचे पदार्थ समोर आले की, अनेकांचा तोंडावरचा ताबा सुटतो. पण, असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. विशेष करुन, रात्रीच्या जेवणात जड पदार्थ खाणे टाळायला हवे. रात्री हलकेच पदार्थ खावेत आणि गरजेपेक्षा जास्त खाऊ नयेत. जड पदार्थ पचण्यास हलके वाटतात.

मेडिटेशन महत्वाचे – 

वाढत्या स्ट्रेसमुळे हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो. स्ट्रेस दूर करण्यासाठी सकाळी योगा आणि मेडिटेशन करणे फायद्याचे ठरेल. योगा आणि मेडिटेशनच्या सरावाने केवळ हार्ट अटॅकचं नव्हे तर अनेक शारीरिक समस्या कमी होतात.

झोपण्यापूर्वी दिर्घ श्वास –

हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी दिर्घ श्वास घ्यायला हवा. दिर्घ श्वास घेतल्याने ताणतणाव जाणवत नाही, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

नियमित व्यायाम –

हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे फायद्याचे ठरेल. तुम्ही केवळ 10 ते 15 मिनिटे व्यायाम करुन हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

स्विमिंग –

स्विमिंग करणे ही फक्त एक ऍक्टिव्हिटी नसून हार्टच्या आरोग्यासाठी सर्वात सोपा उपाय मानला जातो. स्विमिंगच्या सरावाने हाडे मजबूत होतात आणि हार्ट निरोगी राहते.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini