Friday, April 19, 2024
घरमानिनीउष्माघातासंदर्भात 'ही' लक्षण दिसल्यास वेळीच सावध व्हा

उष्माघातासंदर्भात ‘ही’ लक्षण दिसल्यास वेळीच सावध व्हा

Subscribe

उनहाळ्यात कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची ल्हाईल्हाई होते. वारंवार घाम येत राहतो, सारखे थंड प्यावेसे वाटत राहते तर काहींना उन्हामुळे चक्कर सुद्धा येते. उन्हाळ्याच्या दिवसात हिटस्ट्रोक म्हणजेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. काही लोकांना उष्माघासंदर्भात फारसे माहिती नसते. त्यामुळेच आम्ही तुम्हाला उष्माघात म्हणजे नक्की काय आणि त्याची लक्षण काय आहेत याच बद्दल सांगणार आहोत.

उष्माघाताची स्थिती अशावेळी निर्माण होते जेव्हा तुमच्या शरिराला त्याचे तापमान नियंत्रणाबाहेर जाते. उष्माघात झाल्यास शरिरातील तापमान वेगाने वाढते आणि लगेच कमी होत नाही. जेव्हा एखाद्याला उष्माघाताची समस्या होते तेव्हा त्याच्या शरिरातून अधिक घाम येत नाही. त्यावेळी स्वेटिंग मॅकेनिज्म राम करत नाही. हिट स्ट्रोक झाल्यानंतर १०-१५ मिनिटांत शरिराचे तापमान 106°F किंवा त्यापेक्षा अधिक असू शकते. वेळीच उपाय केला नाही तर व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

- Advertisement -

उष्माघाताची लक्षणं
-डोक दुखणे
-डिमेंशिया
-खुप ताप येणे
-बेशुद्ध पडणे
-मानसिक स्थिती बिघडणे
-मळमळ आणि उलटी
-त्वचा लाल होणे
-हृदयाचे ठोके वाढणे
-त्वचा ड्राय होणे

उष्माघाताची कारण काय?
अधिक गरम ठिकाणी राहिल्यास उष्माघाताची समस्या उद्भवू शकते. जर एखाद्या थंड ठिकाणी अचानक गरम होऊ लागल्यास तेथे सुद्धा हिट स्ट्रोकची शक्यता वाढते. गरम वातावरणात अधिक व्यायाम करणे सुद्धा हिट स्ट्रोकचे मुख्य कारण आहे. उन्हाळ्यात अधिकाधिक घाम आल्यानंतर पुरेसे पाणी प्या. जर एखादा अधिक दारुचे सेवन करत असेल तर शरिराचे तापमान नियंत्रणात त्याला ठेवता येत नाही. यामुळे सुद्धा उष्माघाताची समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्ही उन्हाळात अधिक घाम येईल असे कपडे घालत असाल तर त्यामधून हवा आतमध्ये जाणार नाही. यामुळे हिट-स्ट्रोकची समस्या वाढू शकते.

- Advertisement -

उष्माघातापासून दूर राहण्यासाठी करा हे उपाय
जर एखाद्याला उष्माघाताची समस्या झाल्यास तर त्याने वेळीच उपचार करावेत. अशातच काही घरगुती उपाय ही तुम्ही करु शकता.
-ज्या व्यक्तिला उष्माघाताची समस्या निर्माण झालीय त्याने उन्हात जाणे टाळा
-जाड कपडे घालणे टाळा आणि सुती कपड्यांचा वापर करा
-शरिराचे तापमान थंड राहण्यासाठी काहीवेळ कुलर अथवा पंख्याखाली बसा
-थंड पाण्याने अंघोळ करा

 


हे देखील वाचा: वारंवार स्नायू दुखत असतील तर शरिरात ‘या’ गोष्टीची असू शकते कमतरता

- Advertisment -

Manini