मुलांच्या शारीरिक विकासात आहाराचा सर्वात मोठा असतो. योग्य पोषणामुळे मुलांची उंची वाढते आणि त्यांचा शारीरिक विकासही होतो. उंची वाढवण्यासाठी प्रोटिन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि आयर्न्सची गरज असते. आहारातून ही पोषक तत्वे शरीरात न गेल्यास मुलांची वाढ योग्यरित्या होत नाही. मुलांची उंची वाढली नाही तर त्यांना चारचौघात मस्करीला सामोरे जावे लागतेच शिवाय आई-वडीलांना टेन्शन येत. काही वेळा हे जेनेटिक असू शकते तर काही वेळा अपुऱ्या पोषणामुळे होते. चला तर मग जाणून घेऊयात, मुलांची उंची वाढवण्यासाठी नक्की काय करावे.
पुढील उपाययोजना करता येतील –
व्यायाम –
निरोगी शरीरासाठी दररोज व्यायाम करावा, असे सांगितले जाते. एकूणच आरोग्यासाठी व्यायामाचा सराव फायदेशीर असतो. शरीराची उंची वाढवण्यासाठी मुलांना नियमि व्यायाम करण्यासा सांगावा, नक्कीच फायदा होईल. सोपी योगासने करण्यास सांगावी किंवा स्ट्रेचिंग, खांबाला लटकणे करण्याचा सराव मुलांकडून करुन घ्यावा.
झोप –
शरीरासाठी पुरेशी अत्यंत आवश्यक असते. लहान अपुऱ्या झोपेमुळे शरीराच्या व्याधी सुरू होतात. अपुऱ्या झोपेचा परिणाम लहान मुलांच्या उंचीवर दिसून येतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची पूर्ण झोप व्हावी याची काळजी घ्यावी.
ताण-तणावापासून दूर ठेवावे –
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना ताणतणावाची समस्या जाणवत आहेत. मोठ्या माणसांप्रमाणे लहानांनाही स्ट्रेस आहे. या स्ट्रेसचा परिणाम मुलांच्या शरीरावर आणि उंचीवरही होत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना ताण-तणावापासून दूर ठेवायला हवे.
आहारात करावे हे बदल –
- अंड्याला पूर्ण अन्न म्हणतात. अंड्यात प्रोटिन्स, व्हिटॅमिन डी, बी २ यांचे प्रमाण जास्त असते. ही पोषकत्तत्वे उंची वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.
- मुलांच्या आहारात आंबट फळांचा समावेश करावा. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी मुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि ज्याचा सकारात्मक परिणाम मुलांच्या उंचीवर दिसून येतो.
- हाडांच्या मजबूतीसाठी आणि एकूण शारीरिक विकासासाठी पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. पालेभाज्यांच्या नियमित सेवनाने उंची वाढण्यास मदत होते.
- माश्यांमध्ये प्रोटिन्स जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे हाडे आणि स्नायूंच्या विकासासाठी मदत होते.
हेही पाहा –