Saturday, April 20, 2024
घरमानिनीHealthथायरॉईडवर तुळशी, अश्वगंधासह 'या' 5 जडी बुटी आहेत रामबाण उपाय

थायरॉईडवर तुळशी, अश्वगंधासह ‘या’ 5 जडी बुटी आहेत रामबाण उपाय

Subscribe

वारंवार थकवा आणि वजन वाढल्याने गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरिरात होणाऱ्या अशा प्रकारच्या बदलावामुळे थायरॉइड सारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. खरंतर थायरॉइड हे फुलपारखाच्या पंखांसारखे इंडोक्राइन ग्लँन्ड असते. आता पर्यंत जगभरात जवळजवळ 200 मिलियन लोक यामुळे त्रस्त आहेत. थायरॉइड हे दोन प्रकारचे असतात. हायपरथायरॉइड आणि हायपोथायरॉइड. लाफस्टाइमध्ये सामान्य बदल करत या समस्येपासून दूर राहता येऊ शकते. पुढील काही आयुर्वेदातील औषधींच्या मदतीने तुम्ही शरिरातील या समस्येवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. (Herbs for thyroid)

एनसीबीआयच्या मते, हायपोथायरायडिज्म म्हणजेच थायरॉइड सामान्य लोकसंख्येच्या 5 टक्के हिस्स्याला प्रभावित करतो. आकडेवारीनुसार 99 टक्क्यांपेक्षा रुग्ण हे प्राइमरी हायपोथायरायडिज्मने पीडित आहेत. खरंतर जगभरात नैसर्गिक आयोडिनच्या कमतरतेमुळे थायरॉइड डिसऑर्डर होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

थायरॉइडची लक्षणं
मसल्समध्ये दुखण्याची समस्या
हार्मोन असंतुलित होणे
वजन अधिक वाढणे
मानेच्या येथे स्वेलिंग अधिक होणे

पुढील 5 हर्ब्सच्या मदतीने थायरॉइडपासून मिळवा सुटका

- Advertisement -

आलं
मेडिकल न्यूज टुडेच्या मते आल्याचे सेवनाने हाइपोथायरायडिज्मने ग्रस्त लोकांना फायदा होतो. याच्या सेवनाने शरिरात लिपिड आणि हार्मोन प्रोफाइलला सहज नियंत्रित केले जाऊ शकते. आल्यात मॅग्नेशियम असते. याच्या मदतीने थायरॉइडच्या रोगाला नियंत्रित केले जाऊ शकते. मॅग्नेशियम केवळ स्नायूच रिलॅक्सच नव्हे तर हृदयाचे ठोके वाढण्यावर नियंत्रित ही ठेवते. यामध्ये पोटॅशियम शरिरात द्रव पदार्थांना रेग्युलेट करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त विटामिन बी, 6, कॉपर आणि मॅगनीजने समृद्ध असतात. याचसोबत यामध्ये जिंजरोल नावाचे अँन्टी ऑक्सिडेंट सुद्धा असतात.

काळ जीरं
फाइटोकेमिकल्सने समृद्ध असे काळ्या जिऱ्यात अल्कलॉइड, फ्लेवोनोइड्स आणि फेनोलिकसह काही बायोलॉजिक्ल कम्पाउंड असतात. यामुळे शरिरातील काही समस्यांपासून दूर राहता येते आणि शरिरातून हळूहळू थायरॉइडची समस्या दूर होऊ लागते. एनसीबीआयच्या एका अभ्यासानुसार 22 ते 50 वयोगटातील लोकांनी 8 आठवडे तरी काळ्या जिऱ्याचे सेवन केले पाहिजे.

तुळसं
अँन्टी फंगल आणि अँन्टी इफलामेंटरी गुणांनी युक्त तुळशीची पानं थायरॉइडची समस्या दूर करण्याचे काम करते. याची पानं पाण्यात टाकून उकळवून प्यायल्याने किंवा चावून खाल्ल्याने थायरॉइड पासून दिलासा मिळू शकतो. शरिरात अत्याधिक कोर्टिसोल थायरॉइड ग्लँन्ड, ओवरीज आणि पॅनक्रियाजला प्रभावित करते. अधिक प्रमाणात कोर्टिसोल पॅनक्रियामुळे इंसुलिन सिक्रिशन असंतुलित होण्याचे कारण ठरु शकते. यामुळे हायपोग्लाइसीमियाची शक्यता वाढते.(Herbs for thyroid)

मुलेठी
पोषक तत्व भरपूर असलेल्या मुलेठीमुळे आपल्या गळ्याच्या आरोग्यासाठी उत्तम औषध मानले जाते. ट्रीटरपेनोइड ग्लाइसेरीथेनिकने समृद्ध असल्याने मुलेठी थायरॉइडवर फायदेशीर ठरते. मुलेठी थायरॉइडसह आपल्या शरिरात पचनासंबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी बचाव करण्यास काम करते. मेमोरी बूस्ट करण्यासह वजन कमी होण्यास ही फायदेशीर आहे.

अश्वगंधा
हार्मोनल इंबॅलेन्सला सुधारण्यासाठी अश्वगंधा अगती फायदेशीर ठरु शकते. याचे चुर्ण पाण्यात उकळवून पाणी प्यायल्याने खुप फायदा मिळतो. मेडिकल न्यूज टुजेच्या मते, अश्वगंधा शरिरातील ऑक्सिडेंटिव तणाव कमी करण्यास फार फायदेशीर आहे. यामध्ये असणारे विदएफिरिन एक केमिकल कंम्पाउंड असून जे थायरॉइड ग्लॅन्डच्या अॅक्टिव्हिटीत सुधार करतात.


हेही वाचा- थायरॉईडवर रामबाण उपाय आहे ‘हा’ चहा

- Advertisment -

Manini