Monday, April 15, 2024
घरमानिनीBeautyसनटॅनवर 'हे' आहेत आयुर्वेदिक उपाय

सनटॅनवर ‘हे’ आहेत आयुर्वेदिक उपाय

Subscribe

अनेकदा उन्हाळ्यात जास्त बाहेर फिरल्यामुळे सनटॅनची समस्या उद्भवते सनटॅनमुळे हातांसोबत चेहरा देखील काळा पडतो. तसेच सनटॅनमुळे आणि हायपर पिगमेंटेशनमुळे तुमचा चेहरा खूप काळा पडतो. आपल्यापैकी अनेकजण सनटॅनपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करतात, परंतु केमिकलयुक्त महागड्या क्रीमचा वापर करण्यापेक्षा घरगुती आयुर्वेदिक उपायाने देखील तुमचे सनटॅन लवकर कमी होतील.

सनटॅनवर आयुर्वेदिक उपाय

Home Remedies For Sun tan

- Advertisement -
  • दही आणि मध

दही सनटॅनसारख्या समस्यांवर अतिशय उपयुक्त आहे, दह्यामध्ये त्वचा मुळापासून स्वच्छ करणारे गुणधर्म असतात. दह्यात मध मिसळल्यामुळे त्वचेवर आणखी चांगला परिणाम होतो. कारण, मध हे अँटी इनफ्लॅमटरी आहे. कडक उन्हामुळे भाजलेल्या त्वचेला मध आणि दह्याच्या मिश्रणामुळे थंडावा मिळतो आणि त्वचा लवकर पूर्वीसारखी होते.

  • हळद आणि चंदन

हळद आणि चंदन एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा उजळतो. चंदन त्वचेला थंडावा देतं आणि हळदीमुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. ज्यामुळे सनटॅन कमी होते आणि त्वचेला थंडावा मिळतो.

- Advertisement -
  • कोरफडीचा गर

कोरफडीमध्ये अँन्टी बॅक्टेरिअल आणि अँन्टी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात, जर तुम्हाला सुद्धा सनटॅन झाले असतील तर तुम्ही तुमच्या त्वचेवर कोरफडीचा गर लावा, रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर कोरफडीचा गर लावा आणि सकाळी चेहरा धुवून टाका किंवा दिवसातून एकदा कमीत कमी अर्धा तास हा गर चेहऱ्यावर ठेवा. यामुळे तुमच्या त्वचेचा काळसरपणा कमी होईल.

Tan Removal Home Remedies: Easy And Quick - PaisaWapas Blog

 

  • बटाटा रस, दही आणि बेसन

बटाट्याचा रस, दही, बेसन एकत्र मिसळून पॅक तयार करा आणि सनटॅन झालेल्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर धुवून टाका. या पॅकमुळे टॅनिंग कमी होईलच शिवाय तुमची त्वचाही घट्ट होईल.

  • नारळाचे दूध

नारळाच्या दुधामध्ये त्वचेला पोषण देणारे अनेक गुण असतात. नारळाच्या तेलामधील व्हिटॅमिन सीमुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. सनटॅन कमी करण्यासाठी नारळाचे दूध नक्कीच प्रभावी उपाय ठरू शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर कापसाच्या मदतीने नारळाचे दूध लावा. सुकल्यानंतर ते थंड पाण्याने धुवून घ्या.

 


हेही वाचा :

लग्नासाठी ब्रायडल ब्युटीकेअर टिप्स

- Advertisment -

Manini