दातातील किड घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

दातांची योग्य पद्धतीने सफाई झाली नसल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया तोंडामध्ये वाढू लागतात, या बॅक्टेरियांमुळे दातांवर पिवळा रंग जमा होतो. यामुळेच हळूहळू दात किडायला सुरूवात होते

अलीकडे अनेकांना दातांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. जेव्हा आपण काही खातो त्यावेळी त्यातील अन्नाचे काही बारीक कण आपल्या दातांमधील बारीक फटींमध्ये अडकतात. अशावेळी दातांची योग्य पद्धतीने सफाई झाली नसल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया तोंडामध्ये वाढू लागतात, या बॅक्टेरियांमुळे दातांवर पिवळा रंग जमा होतो. यामुळेच हळूहळू दात किडायला सुरूवात होते. अशा कॅविटीपासून सुटका करण्यासाठी अनेकजण डॉक्टरांकडून उपचार घेतात.मात्र तुम्ही घरगुती उपचार करून देखील कॅविटीपासून कायमची सुटका करू शकता.

दातातील किड घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

 • नारळाचे तेल
  एक चमचा नारळाच्या तेलाला तोंडामध्ये ठेवून ५-७ मिनिटापर्यंत ठेवा आणि त्यानंतर ते थुंकून दया. त्यानंतर ब्रश करा.
 • कडूलिंबाची काडी
  नियमीत कडूलिंबाच्या काडीने दात घासा.
 • लवंग
  दातातील किड घालवण्यासाठी कापसाचा एक लहान गोळा घ्या, त्यावर लवंगाचे ३-४ थेंब टाका आणि हा कापसाचा लहान गोळा किडलेल्या दाताखाली ठेवा.
 • लसूण
  लसूण सुद्धा दातातील किड घालवण्यासाठी मदत करतो. यासाठी लसणाची पेस्ट बनवून आपल्या दातांवर १० मिनीटांसाठी लावून ठेवा.