Thursday, April 25, 2024
घरमानिनीऑक्टोबरच्या बदलत्या वातावरणात कोरड्या त्वचेची अशी घ्या काळजी

ऑक्टोबरच्या बदलत्या वातावरणात कोरड्या त्वचेची अशी घ्या काळजी

Subscribe

ऑक्टोबर महिन्यामध्ये हल्की थंडी असते. या काळात वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी त्वचा कोरडी जाणवते. परंतु दुपारच्या वेळी त्वचेला गाम सुटू लागतो. अशावेळी त्वचेची काळजी कशा प्रकारे घ्यावी. ज्यामुळे तुमची त्वचा थंडीमध्ये देखील टवटवीत दिसेल.

त्वचेला ठेवा हाइड्रेट

- Advertisement -


त्वचेला नरम आणि हाइड्रेट ठेवायचं असेल तर त्यासाठी मॉइश्चराइजरचा वापर करा. या ऋतूमध्ये वॉटर बेस्ड मॉइश्चराइजरचा देखील तुम्ही वापर करु शकता. कारण ऑयल बेस्ड मॉइश्चराइजरमुळे त्वचा तेलकट बनते सोबतच यामुळे त्वचेवरील पोर्स बंद होतात. ज्यामुळे त्वचेवर पुरळ्या येतात. त्वचेला हाइड्रेट ठेवण्यासाठी या ऋतूमध्ये जास्त पाणी प्या.

सनस्क्रीन लावा

- Advertisement -


ऑक्टोबर महिन्यामध्ये हल्के ऊन असते. अशामध्ये अनेकजण सनस्क्रिन लावत नाहीत. मात्र तुम्ही अशी चूक करु नका. कारण सनस्क्रीन त्वचा आणि ऋतूमधील संतुलन बसवण्यासाठी मदत करते.

त्वचा स्वच्छ ठेवा


या ऋतूमध्ये त्वचा कोरडी पडते. अशामध्ये त्वचे काळजी घ्यायला विसरु नका. मात्र, त्याआधी चेहऱ्यावर कोणतीही गोष्ट लावण्याआधी चेहरा स्वच्छ करा.

कोरड्या त्वचेसाठी

जर तुमची त्वचा खूप जास्त कोरडी आहे. अशावेळी सतत चेहरा धुवू नका. तसेच चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी मध आणि बदामाचे तेल लावा. त्यानंतर काही वेळाने चेहरा साफ करा. तसेच रात्री झोपताना नाईट क्रिमचा वापर करा. ज्यामुळे रात्रभर त्वता हाइड्रेट राहण्यास मदत मिळेल.


हेही वाचा :

जेवणानंतर चुकूनही करु नका ‘या’ चुका; नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

- Advertisment -

Manini