घरताज्या घडामोडीअशी घ्या नागीण आजाराबाबत काळजी आणि औषधोपचार

अशी घ्या नागीण आजाराबाबत काळजी आणि औषधोपचार

Subscribe

वाचा नागीण या आजाराबाबत

नागीण या आजाराचे नाव ऐकल्यावर आपण घाबरतो. नागीण हा एक त्वचारोग असून यामध्ये वेदनादायक बारीक बारीक असंख्य पुरळ आणि चट्टे उठतात. नागीण या आजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. नागिणीचे तोंड व शेपूट जुळले की रुग्णावर मृत्यू ओढावतो किंवा नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका असतो, असे अनेक गैरसमज नागीण या आजाराबाबत पसरले आहेत. नागिणीचा प्रसार कमी होण्याकरिता योग्य आहार घेणे गरजेचे असते. त्यासाठी औषधोपचार योग्य वेळेस करणे महत्त्वाचे आहे. आज आपण नागीण या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत.

साथीचे आजार हे उन्हाळा सुरू झाल्यास वाढत्या तापमानानुसार पसरतात आणि उन्हाळ्यात हे विषाणू जास्त प्रमाणात पसरतात. लहानपणी सगळ्यांना कांजण्या होतात. या कांजण्यांमुळे त्या आजाराचे विषाणू रुग्णात मज्जारज्जूत वास्तव्य करतात. जेव्हा शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमी होते तेव्हा हे विषाणू जागृत होऊन नागिणीचा आजार पसरवतात. मधुमेह, प्रतिरोधक शक्ती कमी करणारे औषधे, एड्स, केमोथेरपी मध्ये वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती कमी होते आणि नागिणीचा आजार उद्भवतो.

- Advertisement -

नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागात दुखायला लागते. मग त्यानंतर त्वचा हुळहुळी होऊन त्वचेची आगआग होते. चमका येतात. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी पुरळ येतात आणि ते फोड बनतात. ज्या नसेवर फोड येतात ती जागी लालसर होते. तसेच त्या फोडांमध्ये पाणी होते.

शरीराच्या एका बाजूला नागीण येते तर काही वेळेस एकाच नसेवर हा आजार होतो. या आजाराची लागणं दोन ते तीन किंवा अधिक नसांना होऊ शकते. अशा वेळेस उपचार वेळेवर केल्यास तो रुग्ण पूर्णपणे बरा होतो. जर नागिणीची लक्षणे दिसली तर त्वरित ४८ तासांतच वैद्यकीय उपचार घेतल्यास हा आजार आठवड्यात पूर्णपणे बरा होतो. काही वेळेस नागिणीवर घरगुती उपाय केल्यास ती जखम चिघळते आणि अजूनच तो आजार पसरतो. त्यामुळे नागीण झाल्याचे लक्षात आल्यास त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांचा पूर्ण डोस करावा.

- Advertisement -

हा आजारात जास्त दगदग करणे टाळावी. तसंच हलका आहार घ्यावा. अंघोळी केल्यानंतर नागीण झालेली जागा टिपून घ्यावी. स्वतःचे कपडे, साबण, अंथरुण, पांघरुण वेगळे ठेवावे आणि स्वच्छता बाळगावी.


हेही वाचा – अर्धशिशी झाल्यास अशी घ्या काळजी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -