मुंबईसारख्या शहरांमधील घरे ही आकाराने लहान असतात. त्यामुळे अशा घरात सामान व्यवस्थित ठेवणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. अनेकजण तर घर लहान असल्याने गरजेच्या वस्तू खरेदी करणे टाळतात. पण, लहान घरांमुळे वस्तूच खरेदी न करणे हा काही त्यावरील उपाय नाही. अनेकदा तर लहान घरांमुळे सामान्य अस्तावस्त्य पडलेले दिसते. यामुळे संपूर्ण घराचा लूकच बदलून जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरातील असे काही हिडन स्टोरेज सांगणार आहोत, ज्यामुळे घरातील पसारा गायब होइल.
स्टोरेज ऑटोमन (storage ottoman)-
घर लहान असेल आणि घरात सामान जास्त असेल तर अशावेळी तुम्हाला स्टोरेज ऑटोमन उपयुक्त ठरेल. स्टोरेज ऑटोमन घरातील हॉलपासून ते बेडरूमपर्यत वापरता येते. यात तुम्ही वस्तू, पुस्तके, मुलांची खेळणी अशा गोष्टी ठेवू शकता. याशिवाय स्टोरेज ऑटोमन लहान ते मोठे अशा दोन्ही आकारात मिळते.
पायऱ्याखालील जागेत ठेवा सामान –
कित्येक जणांची घरे ही डबल असतात. अशा परिस्थितीत तुम्ही पायऱ्यांखालील जागेत काही सामान ठेवू शकता. सर्वात सोपे म्हणजे शुज, चपला यांसारख्या गोष्टी ठेवता येईल.
फर्निचर विथ बास्केट –
फर्निचर विथ बास्केट हिडन स्टोरेजसाठी वापरता येईल. यात तुम्हाला दोन फायदे होतात, एक म्हणजे फर्निचर तर होइलच शिवाय स्टोरेज साठी जागाही मिळते.
हेडबोर्ड स्टोरेज –
हेडबोर्ड स्टोरेजमुळे घरात पसारा होत नाही. यामध्ये तुम्हाला फोन चार्जर ठेवता येईल. याशिवाय बेडच्या मागे भिंतीतही तुम्हाला स्टोरेज करता येईल.
या वस्तू ठरतील उपयोगी –
चपलांसाठी रॅक –
चपलांचा रॅक आणा, जेणेकरून चपला, बूट यांचा पसारा होणार नाही.
लॉड्रीबिन –
लॉड्रीबिन मध्ये तुम्हाला वापरात नसलेले कपडे ठेवता येतील. ज्यामुळे कपडे इकडे-तिकडे पसरणार नाहीत.
ऑर्गनायझर –
कपाटात ऑर्गनायझर आणावे. यामुळे कपडे व्यवस्थित राहतात आणि कपाटात स्पेसही मिळते.
पॉट –
टेबलवर एखादा पॉट ठेवावा. यात तुम्हाला रिमोट, चाव्या ठेवता येतील.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde