हायपरटेंन्शन म्हणजेच हाड ब्लड प्रेशरच्या समस्येचा समावेश आता लाइफस्टाइल डिसऑर्डरमध्ये झाला आहे. शरीरात योग्य प्रमाणात ब्लड सर्कुलेशन न झाल्याने हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. अशातच तुमच्या एकूणच आरोग्याला यामुळे धोका उद्भवू शकतो. खासकरुन जेव्हा हृदयाच्या आरोग्यासासाठी धोकादायक असते. मात्र तुम्ही काही फूड्सच्या मदतीने उच्च रक्तदाबाची समस्या दूर करू शकता. (High BP problem)
किवी
किवीमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी सह फायबर, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम सारखी पोषक तत्वे असतात. यामुळे ब्लड रेग्युलेशन होण्यास मदत होते. त्याचसोबत किवी मध्ये असलेले प्लांट बेस्ड पॉलीफेनॉल आणि अँन्टीऑक्सीडेंट कंपाउंड ब्लड प्रेशरला सामान्य ठेवच हृदयाच्या आरोग्यासंबंधित जोखीम कमी करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने आपल्या डाएटमध्ये कीवी फळाचा समावेश केला पाहिजे.
पालक
पालकमध्ये पुरेशा प्रमाणात नाइट्रेट्स असतात. त्याचसोबत यामध्ये अँन्टीऑक्सिडेंट, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम ही भरपूर प्रमाणात अशते. हे सर्व पोषक तत्त्वे ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पालक आर्टरी स्टिफनेसला कमी करतात आणि ब्लड प्रेशरच्या समस्येला नियंत्रणात ठेवून हृदयाचे आरोग्य राखले जाते.
चिया आणि फ्लेक्स सीड्स
चिया आणि फ्लेक्स सीडस हे आकाराने लहान असतात. मात्र त्यामधअये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर असतात जे ब्लड प्रेशरचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. सर्व हाय ब्ल़ड प्रेशरच्या रुग्णांनी याचे सेवन केले पाहिजे.
पिस्ता
पिस्त्यात पोटॅशिअमसह काही अन्य पोषक तत्वे असतात. जे हार्ट हेल्थ आणि ब्लड प्रेशर रेग्युलेशनसाठी अत्यावश्यक असते. तर अन्य नट्सच्या तुलनेत पिस्ता ब्लड प्रेशर अधिक प्रभावी रुपात संतुलित ठेवते. ऐवढेच नव्हे तर कोलेस्ट्रॉलचा स्तर ही सामान्य राहण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियात काही पोषक तत्त्वे असतात. यामध्ये असलेले मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आर्जिनाइन आणि अमीनो अॅसिड नाइट्रिक ऑक्साइडच्या प्रोडक्शनसाठी गरजेचे असतात. तर नाइट्रिक ऑक्साइड आफल्या ब्लड वेल्सरला रिलॅक्स करण्यास आणि उच्च रक्तदाबाला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
हेही वाचा- शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे