Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल 'या' गावात महिला 5 दिवस असतात विवस्त्र

‘या’ गावात महिला 5 दिवस असतात विवस्त्र

Subscribe

जग वेगाने पुढे जात आहे. अशातच जगातील अशी काही ठिकाण आहेत जेथे अशा काही परंपरा आहेत ज्याबद्दल लोकांना माहिती नसते आणि त्याबद्दल ऐकल्यानंतर ते हैराण होतात. कधीकधी अशा काही परंपरा असतात ज्यावर विश्वास ठेवणे फार मुश्किल होते. परंतु भारतात आजही अशा प्रकारच्या काही परंपरा आहेत ज्यांचे पालन केले जाते.

खरंतर हिमालयातील मणिकर्ण घाटातील पीणी गावात आज सुद्धा विचित्र पद्धत पाळली जाते. येथील महिला श्रावण महिन्यात एक अनोखी परंपरा जपतात. त्यावेळी महिला या ५ दिवस विवस्र राहतात. पण एखाद्या महिलेने याच दरम्यान कपडे घातल्यास तर ते अशुभ मानले जाते. यामुळे घरात अशुभ घटना घडू शकतात असे मानतात. ही परंपरा आजही गावातील प्रत्येक घरात पाळली जाते.

- Advertisement -

या व्यतिरिक्त पाच दिवस नवरा-बायको एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. तसेच महिला या परंपरेचे पालन करत असतात तेव्हा पुरुष मंडळींना दारुचे सेवन करता येत नाही. स्थानिक लोक असे मानतात की, अशी परंपरा जपली नाही तर त्यांची देवता नाराज होईल.

असे सांगितले जाते की, लाहुआ घोंड देवता जेव्हा या गावात आले होते तेव्हा त्या दरम्यान राक्षसांकडून खुप विनाश केला जात होता. पण देवता पीणीतआल्यानंतर राक्षसांचा विनाश झाला होता. तेव्हापासूनच ही परंपरा चालत आली आहे. जी आजही पाळली जाते. असे मानले जाते की, आजही देवता या गावात राहतात आणि त्यांचे संरक्षण करतात.


- Advertisement -

हेही वाचा- कपाळावर टिळा लावण्याचे काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

- Advertisment -