Hindu Shastra : रविवारच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ देवतेची पूजा, कारण….

हिंदू धर्मात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलेले आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. तर पिंपळाच्या झाडामध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे दैवत विराजमान असतात.

हिंदू शास्त्रात रविवार हा दिवस सूर्य देवांना समर्पित केलेला आहे. सूर्याचा आपल्या आर्शिवाद राहावा यासाठी अनेकजण या दिवशी सूर्याची पूजा करतात, त्यांना अर्घ्य देतात.त्यांच्या स्तोत्रांचे पठण करतात. सप्ताहातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा केली जाते. मात्र हिंदू धर्मात रविवारच्या दिवशी काही देवतांची पूजा करणे अशुभ मानलेले आहे.

हिंदू धर्मात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलेले आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. तर पिंपळाच्या झाडामध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे दैवत विराजमान असतात. तसेच शमीचे झाड शनीदेवांना समर्पित केले आहे. त्यामुळे रविवारी या तीन झाडांची पूजा करणे किंवा त्या झाडांना स्पर्श करणं अशुभ मानले आहे.

रविवारी या झाडांना स्पर्श करू नका

  • तुळशीचे रोपटे
    ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. हिंदू मान्यतेनुसार तुळशीच्या रोपट्याला नियमीत जल अर्पण केल्याने आणि पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. मात्र हिंदू धर्मात रविवारच्या दिवशी तुळशीच्या रोपट्याला स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे. या दिवशी तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. याचं कारण म्हणजे रविवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचा उपवास असतो. त्यामुळे या दिवशी तुळशीला जल अर्पण केले जात नाही.
  • पिंपळाचे झाड
    ज्योतिष शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये ब्रम्ह, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. तसेच संध्याकाळनंतर देवी लक्ष्मीचा वास असतो. मात्र रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाण्यास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक मान्यतेनुसार रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये अलक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे रविवारी या झाडाखाली गेल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते.
  • शमीचे झाड
    शमीचे झाड शनिदेवांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या झाडाची पूजा शनिवारी करणं योग्य मानले जाते. मात्र या दिवसाची पूजा रविवारी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 


हेही वाचा :http://Hindu Shastra : शनीच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी प्रत्येक शनिवारी करा ‘हे’ उपाय