Hindu Shastra : देवघरातील ‘या’ ३ गोष्टी मानल्या जातात अशुभ

हिंदू धर्मात प्रत्येक घर हे घरातील देवघराशिवाय अपूर्ण मानले जाते. देवाची पूजा-आराधना, सेवा करण्यासाठी या जागेला खूप महत्वाचे मानले जाते. त्यामुळे आपल्या घरा इतकीच आपल्या घरातील देव घराची काळजी घेणं देखील गरजेचं आहे

भारतीय परंपरेनुसार जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा घरातील मंदिरासाठी वेगळी जागा निश्चित केली जाते. हिंदू धर्मात प्रत्येक घर हे घरातील देवघराशिवाय अपूर्ण मानले जाते. देवाची पूजा-आराधना, सेवा करण्यासाठी या जागेला खूप महत्वाचे मानले जाते. त्यामुळे आपल्या घरा इतकीच आपल्या घरातील देव घराची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. कारण हे ठिकाण आपल्या घरातील सर्वात जास्त पवित्र स्थान असते. त्यामुळे घराच्या मंदिरात चुकूनही काही अपवित्र किंवा वास्तूदोष निर्माण होतील अशा गोष्टी ठेऊ नये.

तुमच्या देवघरातून ‘या’ 3 गोष्टी आजच काढा

  • हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, देवघरात कधीही तुटलेली खंडित मूर्ती ठेऊ नये. कारण यामुळे घरामध्ये वास्तूदोष निर्माण होतो. तसेच हा देवाचा अपमान समजला जातो, त्यामुळे तुमच्या घरामध्ये देखील अशी मूर्ती असेल तर आजच काढून नदी किंवा तलावात विर्सजीत करा.
  • तसेत घरातील देवघरात कधीही देवांच्या रागीट रूपातील किंवा रूद्र रूपातील फोटो किंवा मूर्ती ठेवू नका. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, अश्या प्रकाऱ्या फोटोंमुळे त्या घरातील वातावरण खराब होऊ शकतं. त्यामुळे घरातील देवी-देवतांचे फोटो नेहमी शांत आणि प्रसन्न भाव व्यक्त करणारे असावे. यामुळे तुमच्या घरात देवतांचा आर्शिवाद राहतो.
  • हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, देवघरात एकापेक्षा जास्त देवी-देवतांचे फोटो नसावे. एकाच देवाचे एकापेक्षा जास्त फोटो ठेवल्याने घरात वास्तूदोष उत्पन्न होतो. त्यामुळे घरात देवांचे कमीत कमी फोटो आणि मूर्ती ठेवावे.

हेही वाचा :Vastu Tips : यंदा श्रावण महिन्यात लावा ‘हे’ झाड; संपूर्ण आयुष्यभर व्हाल मालामाल