कोरोनानंतर चीनमध्ये पुन्हा एकदा एका नव्या व्हायरसने थैमान घालायला सुरूवात केली आहे. HMPV अर्थात ह्युमन मेटान्युमो असे ह्या व्हायरसचे नाव आहे. दिवसेंदिवस चीनमध्ये या व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. डॉक्टराच्या मते, ह्या व्हायरसची लक्षणे कोरोनासारखी नाहीत पण, या व्हायरसचा धोका हा लहान मुलांना जास्त सांगण्यात आला आहे. कोरोनाच्या महामारीनंतर सर्वच जण व्हायरसच्या बाबतील अलर्ट झाले आहेत. पण, पालकांनी HMPV व्हायरस ला न घाबरता काही गोष्टी लक्षात घेतल्या तर मुलांना या व्हायरसपासून दूर ठेवता येऊ शकते.
HMPV व्हायरस कसा पसरतो ?
- HMPV व्हायरस श्वसनासंबधित बॅक्टेरिया आहे.
- हा बॅक्टेरिया लहान मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो.
- शरीरात या व्हायरसने एन्ट्री केल्यावर मुलांना याची लागण होते.
- या व्हायरसची मुलांना लागण झाली की, मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो.
HMPV लक्षणे कोणती –
- ताप
- खोकला
- श्वास घेण्यास अडचण
- फुफ्फुसात इन्फेक्शन
- नाक बंद होणे
- घसा दुखणे
- जुलाब
मुलांची काळजी कशी घ्याल?
- बाहेर अर्थात सार्वजनिक ठिकाणी जाताना मुलांना मास्क घालण्यास सांगावे.
- वारंवार मुलांना हात धुण्याची सवय लावावी.
- गरज नसताना मुलांना गर्दीत नेऊ नये.
- आजारी व्यक्तींच्या संपर्कात मुलांना नेऊ नये.
- मुलांना डोळे, नाक, चेहऱ्याला स्पर्श करण्यास देऊ नये.
- पौष्टिक आहार मुलांना द्यावा, ज्यामुळे मुलांनी इम्युनिटी पॉवर स्ट्रॉग राहिल.
तज्ज्ञ काय सांगतात –
तज्ञ म्हणतात की, साधारणपणे, ५ ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो. तुम्ही जर व्यवस्थित औषधे घेतलीत तर व्यक्ती नक्कीच बरी होऊ शकतो.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –