Holi 2023 : केस, चेहरा आणि नखांवरील रंग निघत नसल्यास ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स

केसांतील, नखातील रंग निघल्या निघत नाही. रंग काढण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागते. काही लोकांच्या चेहऱ्याचा रंग लगेच निघतो तर काहींचा रंग निघायला अनेक दिवस लागतात.

सर्वत्र होळीचा माफोल सुरू आहे. सगळेच होळीच्या तयारीला लागलेत. होळी म्हणजे रंगाचा सण, रंगाची उधळण. हेच रंग खेळण्यासाठी बऱ्याचदा केमिकलयुक्त रंग आणि गुलाल वापरला जातो. आजकाल मार्केटमध्ये मिळणाऱ्या रंगांनी किंवा गुलालाने चेहरा, केस, नखे खराब होतात. केसांतील, नखातील रंग निघल्या निघत नाही. रंग काढण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागते. काही लोकांच्या चेहऱ्याचा रंग लगेच निघतो तर काहींचा रंग निघायला अनेक दिवस लागतात. या होळीला तुमच्या ही चेहऱ्यावर, नखांमध्ये किंवा केसातील रंग निघत नसेल तर काही सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा.

शरीरावरील रंग काढण्यासाठी

Holi 2023 - Easy Hacks to Protect Your Child's Skin, Hair & Nails During  Holi

चेहऱ्यावर किंवा शरिराच्या कोणत्याही अवयवावर लागलेला रंग निघत नसेल तर बरेच जण त्वचा घासतात किंवा स्क्रब करतात. असे केल्याने कदाचित रंग निघून जाईल पण तुमच्या त्वचेचे फार नुकसान होईल.

  • त्यामुळे शरिराच्या कोणत्याही अवयवावरील रंग काढण्यासाठी बॉडीवॉश किंवा साबणाचा वापर करा.

चेहऱ्यावर रंग काढण्यासाठी

Expert tips for skin and hair care this Holi | Lifestyle News,The Indian  Express

  • चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी क्लिजिंग फेस वॉशचा वापर करा.
  • त्यानंतर चेहऱ्याला आठवणीने मॉइस्चराइजर लावा. किंवा फेस मास्कचा देखील उपयोग करू शकता.
  • होळी खेळायला जाण्याआधी चेहऱ्याला तेल लावून बाहेर पडा.
  • त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील रंग घालवण्यासाठी बेसन, दही आणि लिंबूच्या मिश्रणाचा वापर करा. याने त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होईल.

केसांमधील रंग काढण्यासाठी

Holi 2022: Follow These Skin and Haircare Guide to Enjoy the Festival Of  Colours

  • होळी खेळून आल्यानंतर केसांना २ वेळा शॅम्पू करणे गरजेचे आहे.
  • महत्त्वाचं म्हणजे शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर नक्की लावा.
  • कंडिशनरने तुमचे केस हायड्रेट होण्यास मदत होईल.
  • कंडिशनरनंतर केसांना हेअर सीरम लावा.
  • हेअर सिरीम तुमच्या ड्राग केसांना रिपेअर करण्यास मदत करेल.

नखांमधील रंग काढण्यासाठी

Holi 2019: Organic Guide To Protect Skin, Eyes From Colors

  • होळी खेळल्यानंतर सर्वात जास्त रंग हा आपल्या नखांमध्ये जातो. जो आपल्या शरिरासाठी फार हानिकारक असतो. त्यामुळे केस किंवा चेहऱ्यांवरील रंग काढण्यासाठी तुमच्या नखांमधील रंग सर्वात आधी काढा.
  • नखांमधील रंग काढण्यासाठी कोमट पाण्यात बदामाचे तेल किंवा व्हिनेगर घ्या.
  • बदाम तेल किंवा व्हिनेगरच्या पाण्यात नखे बुडवून ठेवा.
  • असे ३-४ दिवस सतत करा नखांमधील रंग हळूहळू कमी होईल.

हेही वाचा : 

Holi 2023 : रंगपंचमीला तुमच्या राशीनुसार वापरा ‘हे’ रंग; वाढेल यश, मिळेल कीर्ती