होळीच्या सणाला काहीच दिवस शिल्लक आहेत. रंगांच्या या सणाचे आकर्षण प्रत्येकालाच असते. रंगीबेरंगी वातावरणाने संपूर्ण माहोल बदलून जातो. तुम्हाला ठाऊक असेलच की होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये, गुलालामध्ये केमिकल्स असतात. या रासायनिक रंगांमुळे स्किन खराब होण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत, जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि कोरडेपणा यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. एकदा त्वचेला इजा झाली की ती बरी होण्यास बराच वेळ लागतो. अशा परिस्थितीत काही लोक होळी अजिबात खेळत नाहीत. तर काही लोक आयुर्वेदिक रंग वापरतात, परंतु कधीकधी काही लोक अनेकदा आपल्या नकळत काही जण आपल्याला कोणताही रंग किंवा गुलाल लावतात. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होणे स्वाभाविक आहे. जर तुमच्या त्वचेलाही होळीच्या रंगांमुळे अशा समस्या होत असतील, तर आज या लेखात जाणून घेऊयात काही उपाय ज्यामुळे तुम्ही होळीच्या दिवशी रंग आणि गुलालामुळे तुमची त्वचा खराब होण्यापासून वाचवू शकता.
होळी खेळण्यापूर्वी तुमच्या त्वचेवर लावा या गोष्टी
नारळ तेल
जेव्हाही तुम्ही होळी खेळायला जाल तेव्हा तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर नारळाचे तेल चांगले लावा. असे केल्याने, कोणताही रंग त्वचेवर फार काळ चिकटून राहणार नाही आणि त्याचा त्वचेवर कोणताही परिणाम होणार नाही. नारळाचे तेल केस आणि त्वचेसाठी देखील चांगले असते.
कोरफड जेल आणि गुलाबजल
याशिवाय, कोरफडीच्या जेलमध्ये थोडे गुलाबजल मिसळा आणि त्याद्वारे चेहऱ्याला चांगले मसाज करा. असे केल्याने तुमच्या त्वचेला होळीच्या रंगांमुळे पुरळ, खाज सुटणे इत्यादी समस्या उद्भवणार नाहीत.
नारळ पाणी
थंड पदार्थ त्वचेसाठी चांगले असतात, म्हणून होळी खेळण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर नारळ पाणी देखील लावू शकता. यामुळे होळीच्या रंगांचा त्वचेवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय, तुमची त्वचा देखील चमकेल.
बेसन आणि मोहरीचे तेल
जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर होळीच्या दिवशी सकाळी बेसनात गुलाबपाणी , दही आणि थोडेसे मोहरीचे तेल मिसळून फेस मास्क बनवा आणि काही वेळ चेहऱ्यावर लावा. नंतर काही वेळाने चेहरा धुवा आणि गुलाबजल लावा. यानंतर तुम्ही होळी खेळू शकता. असे केल्याने त्वचेवर गुलाल आणि रंगाचा कोणताही परिणाम होणार नाही.
पुदिना जेल
होळीच्या रंगांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे जेल देखील वापरून पाहू शकता. यामुळे त्वचेला खूप थंडावा मिळेल. अशा परिस्थितीत खाज सुटणे आणि कोरडेपणा अशा समस्या उद्भवणार नाहीत.
हेही वाचा : Health Tips : कॉफी बरोबर ही 12 औषधं घेणे धोकादायक
Edited By – Tanvi Gundaye