होळीच्या सणाला काहीच दिवस शिल्लक आहेत. या खास प्रसंगी होळीच्या रंगांमध्ये रंगून जाण्यासाठी महिला पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याला प्राधान्य देतात. जर तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या पोशाखात खास लूक हवा असेल तर तुम्ही त्यासोबत बांधनी प्रिंटचा दुपट्टा स्टाईल करू शकता. या प्रकारचे बांधनी प्रिंट दुपट्टे तुमचा लूक पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. त्यांना स्टाईल केल्यानंतर तुमचा लूकही सुंदर दिसेल.
बांधनी प्रिंट सिल्क दुपट्टा

जर तुम्ही पांढरा किंवा क्रीम रंगाचा सूट घातला असेल तर तुम्ही बांधनी प्रिंट सिल्क दुपट्टा स्टाईल करू शकता. या प्रकारच्या रेशमी दुपट्ट्यावर सोनेरी रंगाचा काठ पाहायला मिळतो. होळीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या पोशाखासोबत या प्रकारचा दुपट्टा स्टाईल करू शकता आणि हा दुपट्टा स्टाईल केल्यानंतर तुम्हाला ग्रेसफुल लूक मिळेल. तुम्ही या प्रकारचा दुपट्टा बाजारातून किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून 300 ते 400 रुपयांना खरेदी करू शकता.
बहुरंगी बांधणी दुपट्टा

जर तुम्हाला नवीन रंग आणि डिझाइनमध्ये काहीतरी हवे असेल तर तुम्ही मल्टी कलर बांधणी सॉफ्ट सिल्क दुपट्टा स्टाईल करू शकता . या प्रकारचा दुपट्टा तुमचा लूक स्टायलिश आणि सुंदर बनवण्यास मदत करेल. अशाप्रकारचा कलरफुल दुपट्टा होळीसाठी परफेक्ट ऑप्शन ठरू शकतो. तुम्ही हा दुपट्टा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून 400 रुपयांना खरेदी करू शकता.
ग्रेडियंट कलर बांधणी दुपट्टा

जर तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायचे असेल तर तुम्ही तुमच्या पांढऱ्या पोशाखासोबत या प्रकारचा दुपट्टा स्टाईल करू शकता. यात तुम्हाला एकाच रंगाच्या दोन -तीन शेड्स मिळू शकतात. आणि त्यावर बांधणी स्टाइलची डिझाइन मिळू शकते. या प्रकारच्या दुपट्ट्याला तु्म्ही कॉन्ट्रास्ट रंगाचे लटकनही जोडू शकता.
प्रिंटेड बांधणी दुपट्टा

तुमच्या पोशाखात रॉयल लूक येण्यासाठी तुम्ही या प्रकारच्या प्रिंटेड दुपट्ट्याला स्टाईल देखील करू शकता . या प्रकारच्या दुपट्ट्यात तुम्ही खूप सुंदर आणि वेगळ्या दिसाल. तुम्ही हा दुपट्टा 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक डिझाइन पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.
हेही वाचा : Summer Travelling Tips : उन्हाळ्यात या बेस्ट ठिकाणांना द्या भेट
Edited By – Tanvi Gundaye