Friday, March 28, 2025
HomeमानिनीHealthHoli Pet Care : होळीला पाळीव प्राण्यांचीही घ्या विशेष काळजी

Holi Pet Care : होळीला पाळीव प्राण्यांचीही घ्या विशेष काळजी

Subscribe

होळी, रंगपंचमी या सणांना लोकांचा उत्साह, आनंद अगदी शिगेला पोहोचलेला असतो. विविध रंगांची उधळण करत हा सण साजरा होतो. रंगांच्या पिचकाऱ्या, फुगे, खाण्यापिण्याचे पदार्थ यांची नुसती रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. अशा परिस्थितीत ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांना मात्र या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठी विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. केमिकलयुक्त रंगांचा परिणाम माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांकरताही नुकसानकारक ठरू शकतो. जर तुमच्याकडेही कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी असतील तर तुमच्यासाठी हा लेख फार उपयुक्त ठरू शकतो.

पाळीव प्राण्यांचे रंगामुळे काय नुकसान होते ?

होळीच्या रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात. यामुळे प्राण्यांच्या त्वचेला आणि डोळ्यांना ऍलर्जी होऊ शकते. त्यांच्या नाकात जळजळ होऊ शकते. त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. काही वेळा प्राण्यांना गोड खाल्ल्यामुळेही ऍलर्जी होऊ शकते. होळीला असे पदार्थ खाल्ल्याने प्राण्यांच्या यकृतालाही समस्या निर्माण होऊ शकते. त्यांचे पोटही खराब होऊ शकते.

होळीच्या दिवशी गर्दीपासून ठेवा दूर

होळीला लोक एकमेकांच्या घरी भेटी देतात. घरात पाहु्ण्यांची ये-जा असते. अशात आपल्या पाळीव प्राण्यांना गर्दीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांना वेगळ्या खोलीतही ठेवू शकता. वेगळ्या खोलीत त्यांच्यासाठी काही खेळणी आणि खाण्याचे सामान ठेवू शकता.

विशेष पदार्थ खायला देऊ नका

होळीसाठी घरात गोडधोड पदार्थ हे बनवले जातातच. पाळीव प्राण्यांना मात्र हे तळलेले गोड पदार्थ खायला देणे टाळा. यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते.

Holi Pet Care: Take special care of pets on Holi

रंगांपासून ठेवा दूर :

काही वेळा मुले खेळता खेळता प्राण्यांवरही रंग टाकतात. यामुळे प्राण्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. केमिकल यु्क्त रंगांमुळे त्यांच्या त्वचेला इजा होऊ शकते. इतकंच नाही तर त्यांच्या डोळ्यावरही त्याचा वाईट परिणाम पडू शकतो.

होळीला पाळीव प्राण्यांना कसे सांभाळाल?

होळीच्या दिवशी प्राण्यांना सुती कपड्यांमध्ये ठेवा. त्यांना कपड्याने कव्हर करा.

प्राण्यांना रंग लावणे किंवा त्यांच्यावर पाणी ओतणे असे प्रकार रोखण्यासाठी मुलांना समजवा.

रंगांपासून संरक्षण मिळावे म्हणून आपण त्वचेला रंग खेळण्यापूर्वी तेल लावतो. तसे तेल प्राण्यांना अजिबात लावू नये.

प्राण्यांना लागलेला रंग काढून टाकण्याकरता डिटर्जंट, नेल पॉलिश रिमूव्हर अशा वस्तूंचा वापर करू नका.

होळीचे रंग काढण्यासाठी प्राण्यांच्या केसांमधून कंगवा फिरवू नका.

हेही वाचा : Health Tips : मळलेल्या उशीवर डोके ठेवून झोपण्याचे परिणाम


Edited By – Tanvi Gundaye

Manini