हिंदू सणांपैकी अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा साजरी केली जाते. होळीच्या दिवशी संपूर्ण देशभरात होळी पेटवून नकारात्मक ऊर्जेचा त्याग करण्यात येतो. वास्तुशास्त्रानुसार या दिवशी काही उपाय केल्यास घरात आनंद, समृद्धी, शांती आणण्यास आणि नकारात्नक ऊर्जा दूर करण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला फक्त होळी दहनाच्यावेळी काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात होळीत कोणत्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते.
नारळ –
होळी दहन पूजेवेळी एक नारळ घ्यावा. त्याची हळद-कुंकूवाने पुजा करावी. नारळाचे पुजन झाल्यावर नारळ होळीत अर्पण करावा. असे केल्याने अनेक समस्यांपासून सुटका होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सतत कलह होत असतील तर हा उपाय अवश्य करावा.
काळे तीळ आणि मोहरी –
वास्तुदोष असेल तर होळीत काळे तीळ आणि मोहरी अर्पण करावी. यामुळे घरातील नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो, असे सांगितले जाते.
तूप –
लग्न जुळविण्यात अडचणी येत असतील तर होळीची पुजा केल्यावर तूप टाकावे. असे मानले जाते की, या उपायामुळे विवाहातील अडचणी दूर होतात आणि लग्नाचा योग लवकर जुळून येतो.
गव्हाचे कणीस –
होळी दहनाच्यावेळी गहू आणि हरभरा अर्पण करावे. हा उपाय केल्याने आर्थिक चणचणी दूर होतात, असे मानले जाते.
होळीच्या दिवशी या गोष्टी दान करणे शुभ –
होळीला हरभरा डाळ, पिवळे कापड, केळी यासारख्या पिवळ्या वस्तूंचे दान करावे.
हेही पाहा –