प्रत्येकाला आपलं घर सुंदर दिसावे अशी इच्छा असते. त्यामुळे अनेकजण खिशाला कात्री देऊन घरासाठी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तु विकत आणतात आणि घर सजवतात. पण, प्रत्येकाला हे जमेल असे नाही. आता तर सणासुदिचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे बाजारातील सर्वच गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही कमी खर्चातही घर सजवू शकता. जाणून घेऊयात, अशा काही सोप्या ट्रिक्स ज्याचा साहाय्याने कमी खर्चात घराचा लुक सुंदर करता येईल.
घर सजवण्यासाठी वापरा या ट्रिक्स –
घराचा लुक सुंदर दिसण्यासाठी फर्निचर अतिशय महत्त्वाचे असते. आता घराचा लुक बदलण्यासाठी तुम्ही फर्निचर बदलायला हवे असे नाही, त्याऐवजी तुम्ही जुन्या फर्निचरला नवीन रंग देऊ शकता. याने तुमचा जास्त खर्च होणार नाही.
घर सजवण्यासाठी सर्वात पहिले घराचा रंग बदलण्यात येतो. पण, संपूर्ण घराला रंग द्यायचा म्हणजे मोठे खर्चिक काम असते. अशावेळी तु्म्ही वॉल स्टिकर्सचा पर्याय निवडू शकता. वॉल स्टिकर्समुळे घराला आकर्षक आणि ट्रेंडी लूक मिळतो. त्यामुळे कमी खर्चात घर सजवण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते. तसेच घरातील इनडोअर प्लांटमुळे घराची सुंदरता अधिक वाढते. त्यामुळे स्नेक प्लांट, बांबू प्लांट, स्पायडर प्लांट अशी झाडे तुम्ही घरात लावू शकता.
दरवाजाचा लुकही तुम्हाला बदलता येऊ शकतो. घराचा मुख्य दरवाजा तुमच्या घराचा लुकमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे मुख्य दरवाज्यावर तुम्ही प्लास्टिकचे तोरण किंवा फूलांच्या माळा लावू शकता. याने दरवाज्याचा लुक सुंदर दिसेल.
जर तुम्हाला शिवणकाम, भरतकाम आवडत असेल तर तुम्ही या गोष्टींचा वापर करून घरासाठी शोभेच्या वस्तु बनवू शकता. भरतकाम केलेली एखादे चित्र तुम्हाला लावता येईल किंवा पेंटिग्स सुद्धा तुम्हाला लावता येतील.
घरात तुम्ही लाइट्स लावू शकता. हल्ली बाजारात विविध प्रकारचे लॅम्प, बल्ब मिळतात ते तुम्ही लावू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही काचांचा वापर करू शकता.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde