Friday, February 7, 2025
HomeमानिनीHome Decor Tips- घरासाठी परफेक्ट पडदे कसे सिलेक्ट करायचे?

Home Decor Tips- घरासाठी परफेक्ट पडदे कसे सिलेक्ट करायचे?

Subscribe

आपल घर सुंदर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यामुळे प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार घर डेकोर करत असतो. त्यातच हल्ली घर सजवण्यासाठी बरेचजण इंटीरियर डेकोरेटरची मदत घेतात. पण त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याने सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. अशावेळी थोडी कल्पकता वापरून देखील तुम्ही घर आकर्षक बनवू शकता. त्यासाठी सर्वप्रथम घराच्या रंगानुसार पडदे निवडावे. कारण पडदे घराला वेगळा लूक देतात. त्यासाठी घराचे आकारमान, रंग, घरात येणारा सूर्यप्रकाश यासाऱख्या गोष्टींचाही विचार करावा .

लहान घर
मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये घरांच्या किंमती जरी लाखो करोडोंमध्ये असल्या तरी त्या तुलनेत घर मात्र लहान असतात. यामुळे घर डेकोर करत असताना या गोष्टींचा नक्की विचार करावा.
जर घर लहान असेल तर पडदे लटकवण्याचा रॉड उंचावर ठेवावा. त्यामुळे लहान रुमही मोठा दिसतो.

प्रिंटेट

हल्ली लाईट आणि हॅवी प्रिंट असलेले पडदे बाजारात उपलब्ध आहेत. पण ते विकत घेताना ज्या भिंतीच्या शेजारील दरवाजा किंवा खिडकीला तुम्ही पडदे लावणार आहात त्याची रंगसंगती बघूनच पडदे घ्या.

फॅब्रिक
बाजारात वेगवेगळ्या प्रकाराच्या कापडांचे पडदे उपलब्ध आहेत. यात हेवी वेलवेट, डिझायनर ते पारदर्शक कापडांपर्यंतचे पडद्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. पण फक्त दिसायला सुंदर आहेत म्हणून किंवा तुमचा आवडता रंग आहे म्हणून पडदे विकत घेऊ नका. तर ते तुमच्या घराच्या रंगाला शोभून दिसतात का ते ही पाहावे. तसेच घरातील फर्निचरलाही पडदे मॅच झाले पाहीजे. जर तुम्हाला घरात भरपूर उजेड हवा असेल तर हलक्या रंगाचे पडदे निवडावे. तसेच जर रुममध्ये पारंपारिक सजावट असेल किंवा तसे शोपीस ठेवलेले असतील तर हॅवी फॅब्रिकचा पडदा शोभून दिसतो.

फर्निशिंग

तसेच पडद्याचा रंग घरातील फर्निशिंग वस्तूंशी जुळतोय का ते ही पाहा. तुम्ही तुमच्या घरासाठी भिंतींच्या रंगाशी जुळणारे रंगाचे पडदेही निवडू शकता. त्याच वेळी, जर तुम्हाला सर्वांचे लक्ष पडद्याच्या डिझाइनकडे वळवायचे असेल, तर भिंती आणि फर्निचरमधून विरोधाभासी रंगाचा पडदा निवडा.

लांबी

घराला आकर्षक लुक देण्यासाठी थोडा लांब पडदा निवडावा. त्यामुळे भिंत उंच दिसते आणि रुमही मोठा दिसतो. खिडकीसाठी पडदे निवडताना, तुम्ही पूर्ण-लांबीचे आणि लहान पडदे दोन्ही निवडू शकता.


Edited By

Aarya joshi

Manini