आपल्या प्रत्येकाच्या घरात सोफा असतो. पण या सोफ्याची काळजी घेतली गेली नाही तर सोफा खराब होऊ लागतो. वेळेनुसार, सोफ्याचा रंगही उडू लागतो. आणि सोफा जुना दिसू लागतो. अशावेळी सोफ्याचे कव्हर चेंज करून तुम्ही सोफ्याला नवा लूक देऊ शकता. कारण हल्ली सोफ्याच्या कव्हरमध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आल्या आहेत.
नॉन स्लिप स्ट्रेचेबल सोफा कव्हर :
अशा प्रकारचे कव्हर्स दिसायला खूप सुंदर दिसतात. यांची खास गोष्ट ही की हे कव्हर्स सोफ्याला चिकटतात. जेव्हा तुम्ही यावर बसता तेव्हा ते निघत नाहीत किंवा खराबही होत नाहीत. हे कव्हर्स सोफ्याला अगदी परफेक्ट बसतात.
कॉटन सोफा कव्हर सेट :
कॉटन सोफा कव्हर उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे आणि यात अनेक रंग तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात. कॉटनचे कव्हर्स जर पांढऱ्या रंगात असतील तर त्यावर तु्म्ही फॅब्रिक कलर्सचा वापर करून नक्षीकाम देखील करू शकता किंवा भरतकामही करू शकता.
पॉलिस्टर ब्लेंड :
पॉलिस्टर ब्लेंड सोफा कव्हर्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे दिसायला खूप सुंदर दिसतात. आजकाल यामध्ये खूप डिझाईन्स पाहायला मिळतात. तुमच्या सोफ्याला थोडा हटके लूक देण्यासाठी तुम्ही या सोफा कव्हर्सचा विचार करू शकता.
वेलवेट एंटी स्लिप सोफा कव्हर :
जर तुम्हाला तुमच्या सोफ्याला रॉयल आणि क्लासी लूक द्यायचा असेल तर तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता. या प्रकारच्या कव्हर्समध्ये डार्क मरुन आणि गडद निळा, गुलाबी असे रंग खूप उठावदार दिसतात.
रेन्बो मल्टीकलर सोफा कव्हर्स :
रेन्बो सोफा कव्हर्समध्ये तुम्हाला राजस्थानी डिझाईन्स अधिक पाहायला मिळतील. या डिझाईन्समुळे संपूर्ण घराचा लूक बदलतो. आणि घर अगदी रंगीन होऊन जातं.
हेही वाचा : Fashion Tips : ऑफिस आऊटफिटला असं बनवा पार्टी वेअर
Edited By – Tanvi Gundaye