Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल लग्नासाठी घर असे सजवा...

लग्नासाठी घर असे सजवा…

Subscribe

लग्नाच्या तयारीसाठी संपूर्ण घरातील मंडळी आणि नातेवाईक कामाला लागतात. लग्नासंबंधिक चेकलिस्टनुसार प्रत्येकाला कामे वाटून दिली जातात. याच दरम्यान लग्नाचे डेकोरेशन हे खास आणि महत्त्वाचे असते. तुम्ही भले वेन्यू कोणताही ठरवला असेल. पण लग्नघरात सजावट हमखास केली जाते. त्यामुळे लग्नासाठी घर कसे सजवायचे याच बद्दलच्या टीप्स आपण पाहणार आहोत.

फूलांचा वापर

- Advertisement -

Mostash Events - Decorator - Belgaum City - Weddingwire.in
लग्नासाठी जे काही गरजेचे आहे त्या सर्व गोष्टी केल्या जातात. त्यामुळे घराचे डेकोरेशन करायचे असेल तर फुलांचा वापर करू शकता. लिविंग एरियाचे कोपरे तुम्ही सुगंधी फुलांनी सजवा. त्याच ठिकाणी एखादा सेल्फी झोन ही बनवा. झेंडूऐवजी तुम्ही ऑर्किड आणि लिलीच्या फुलांची सजावट करू शकता. फ्लोरल थीमनुसार ही घराची सजावट करू शकता.

लिविंग एरिया असा सजवा

- Advertisement -


घरातील लिविंग एरिया सजवताना विशेष काळजी घ्या. येथे तुम्ही सोफा किंवा फरशीवर सुंदर अशी सीटिंग अरेंजमेंट करू शकता. तेथे उत्तम लाइटिंग ही करा. जेणेकरुन पूर्णपणे सर्वांचे लक्ष नवं वधू किंवा वराकडे जाईल.

तुम्ही बाल्कनीत लहान मिरर, प्लांटर्स आणि स्ट्रिंग लाइट्सचा वापर करून कोजी आणि कंम्फर्टेबल डेकोरेशन करू शकता. या व्यतिरिक्त आपल्या डाइनिंग स्पेसवर बुफे सेटअप ठेवू शकता.

लाइटिंग


कोणताही लग्नसोहळा हा लाइटिंग शिवाय पूर्ण होत नाही. अशातच घरातील प्रत्येक कोपरा लाइटिंगने सजवा. जर तुमच्या घराबाजूला झाडं असतील तर त्यावर ही लाइटिंग करू शकता.

घराची लॉबी किंवा कॉरिडोरला सजवण्यासाठी तुम्ही साडी किंवा राजस्थानी प्रिंटची ओढणी वापरू शकता. प्लेन गुलाबी रंगाच्या कपड्याने ही सजावट करू शकता.

वेडिंग डेकोरसाठी पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी सुद्धा अशा प्रकारे घर सजवू शकता.


हेही वाचा- लग्नसोहळ्यासाठी वेन्यू निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

- Advertisment -