Wednesday, May 31, 2023
घर मानिनी घरच्या घरी बनवा गरम मसाला

घरच्या घरी बनवा गरम मसाला

Subscribe

आपल्याकडे घराघरात वर्षभर पुरतील असे मसाले साठवून ठेवले जातात. म्हणूनच उन्हाळा सुरू झाला की महिलांची याच मसाले बनवण्याची लगबग सुरू होते. आज आपण हे मसाले कसे बनवायचे ते बघणार आहोत.

जगभरात भारतीय खाद्य संस्कृतीला विशेष महत्व आहे. त्याचे कारण आहे भारतीय जेवणात वापरण्यात येणारे विविध प्रकारचे मसाले. कारण या मसाल्यांमध्ये औषधी गुण असतात. यामुळे भारतीय खाद्यपदार्थात साध्या भाज्या, आमटी ते अगदी थेट उसळी आणि भातात मसाल्याचा वापर केला जातो. त्यामुळे पदार्थाला चव तर येतेच पण त्याबरोबर त्याचा आरोग्याला लाभही होतो. यामुळे आपल्याकडे घराघरात वर्षभर पुरतील असे मसाले साठवून ठेवले जातात. म्हणूनच उन्हाळा सुरू झाला की महिलांची याच मसाले बनवण्याची लगबग सुरू होते. आज आपण हे मसाले कसे बनवायचे ते बघणार आहोत.

- Advertisement -

गरम मसाला

साहीत्य- अर्धा कप जीरे, अर्धी वेलची, पाव कप काळी मिरी, पाव कप धने, ३-४ सुकी लाल मिरची, तीन मोठे चमचे बडीशोप, दोन मोठे चमचे लवंग, १० दालचिनीच्या काड्या, ४-५ तेजपानं, दोन चमचे शाह जिरा, एक चमचा जायफळ, अर्धा चमचे आल्याची पावडर.

- Advertisement -

 

कृती- मंद आचेवर एका कढईत धने खरपूस भाजून घ्यावेत. धने चांगले भाजल्यावर त्याचा सुगंध येतो. नंतर त्यात जीरे, शाह जिरे, काळी मिरी, सुकलेली लाल मिरची खरपूस परतून घ्या. नंतर कढईतील सर्व जिन्नस पुन्हा एकदा मंद आचेवर परता. मसाले करपणार नाहीत एवढी काळजी नक्की घ्या. नंतर जिन्नस थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घ्या. त्यात आले पावडर टाकून हवाबंद डब्यात ठेवा.

 

 

 

 

 

- Advertisment -

Manini