प्रत्येक महिलेला वाटते की, आपले केस लांब आणि चमकदार असावेत. त्यासाठी विविध ब्युटी ट्रिटमेंटट केल्या जातात. तर काहीजण घरगुती उपायांनी आपल्या केसांची काळजी घेतात. अशातच चमकदार केसांसाठी घरच्या घरी हेअर मास्क कसा तयार कराल याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. (Home made hair mask)
अंड्याचा हेअर मास्क
अंड्याच्या हेअर मास्कमध्ये व्हिटॅमिन ए ई, बायोटिन आणि फोलेट सारखी पोषक तत्वे असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. हेअर मास्क तयार करण्यासाठी अंड्याचा सफेद भाग घेत त्यात बदामाचे तेल, एलोवेरा जेल मिक्स करा. हे मिश्रण केसांना 30-40 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर हेअर वॉश करा.या व्यतिरिक्त तुम्ही अंड्यात ऑलिव्ह ऑइल सुद्धा मिक्स करु शकताय जवळजवळ अर्धा तासानंतर केसांना शॅम्पू करा.
DIY हेअर मास्क
हा हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्ही दोन चमचा अळशीच्या बिया, दोन चमचा तांदूळ घ्या. आता तुम्ही दोन्ही गोष्टी एका ग्लासात पाणी टाकून उकळवा. कमीत कमी 10-12 मिनिटे उकळवा. जेव्हा जेल सारखे तुम्हाला दिसेल तेव्हा गॅस बंद करा आणि एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यानंतर तुम्ही केसांना तो मास्क लावा. हा मास्क जवळजवळ अर्धा तास तरी केसांना राहू द्या. त्यानंतर व्यवस्थितीत हेअर वॉश करा.