घरलाईफस्टाईलसर्दी - खोकल्यावर घरगुती टीप्स

सर्दी – खोकल्यावर घरगुती टीप्स

Subscribe

सर्दी - खोकला झाल्यास व्यक्ती हैराण होते. त्याचबरोबर सर्दी - खोकला हा मोठा आजार देखील नाही की डॉक्टरांकडे जाणे आवश्यकच असते. अशावेळी घरगुती उपाय केल्यास देखील त्वरित आराम मिळतो. जाणून घेऊया सर्दी - खोकल्यावर घरगुती टीप्स.

पावसाळा म्हटंल की सर्दी – खोकल्या सारखे आजार डोक वर काढतात. सर्दी – खोकल्यामुळे खूपच अस्वस्थ वाटते. सर्दी – खोकला हे गंभीर आजार नसल्यामुळे आपण डॉक्टरांकडे जाणे देखील टाळतो. मात्र या आजारांवर घरगुती उपाय केल्यास त्वरित आराम मिळतो. हे कोणते उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत.

हळदीचे दूध

सर्दी – खोकला झालेल्या व्यक्तींने सर्वप्रथम हळद घालून दूध पिणे. हा सर्वात सोपा आणि झटपट उपाय आहे. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत कोणी ही हळदीचे दूध घेऊ पिऊ शकतात. हळदीच्या दूधाला कोणताही अपाय नाही. हळद ही अँटी बॅक्टेरिअल असल्यामुळे ती सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. सर्दी-खोकला झाल्यास रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी दूधात हळद घालून ते दूध पियावे यांने त्वरित आराम पडतो.

- Advertisement -

gavati tea

चहा

सर्दी – खोकला झाल्यास गवती चहा पिल्यास आराम मिळतो. गवती चहा, आलं, लवंग, दालचिनी आणि काळीमिरी यांचा एकत्र काढा करुन पिल्यास आराम मिळतो. त्याचबरोबर दूधात किंवा गरम पाण्यात आलं बारीक करुन उकळवून पियावे या चहाने सर्दी – खोकला कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

Tulsi leaves

तुळशीची पाने

१२ ते १५ तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्या. ही पाने आणि आल्याचा तुकडा एक कप गरम पाण्यात टाकून हे पाणी उकळून ते थंड झाल्यानंतर पिल्यास त्वरित आराम मिळतो. त्याचबरोर एक कप पाण्यात तुळशीची पाने टाकून ते पाणी १० मिनिटे उकळवा थंड झाल्यावर त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. लिंबाच्या रसात क जीवनसत्व असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे हा काढा पिल्यास सर्दी – खोकला कमी होण्यास मदत होते.

Neem leaves

कडूलिंबाची पाने

घसा दुखत असल्यास एक ग्लास पाण्यात दोन ते तीन कडूलिंबाची पाने टाकून पाणी उकळवून घेणे. पाणी थंड झाल्यानंतर त्या पाण्यात एक चमचा मध घालून हे मिश्रण एकत्र करुन त्याच्या गुळण्या कराव्या यामुळे घशाला आराम मिळतो.

black-pepper

काळीमिरी

कफाचा खोकला झाला असल्यास चार ते पाच काळीमिरी, जीरे आणि गूळ पाण्यात एकत्र मिक्स करुन ते पाणी उकळून घ्या. हे उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर त्याचे सेवन केल्यास कफाचा खोकला झाला असल्यास तो काढा पियाल्यास आराम मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -