घरलाईफस्टाईलकेसातील कोंड्यावर करा 'हे' उपाय

केसातील कोंड्यावर करा ‘हे’ उपाय

Subscribe

केसात कोंडा होणे ही प्रत्येक महिलेची समस्या असते. अनेक स्त्रिया कोंड्याच्या समस्येवर अनेक महागाईचे प्रॉडक्स देखील वापरतात. मात्र याचा काही फायदा होत नाही परंतु घरच्या घरी हे उपाय केल्याने केसातील कोंडा दूर होतो.

केसांची त्वचा कोरडी असल्याने कोंड्याची समस्या उद्भवते. कोंड्यामुळे केस कोरडे होणे, केस गळणे, चेहऱ्यावर पुरळ येणे अशा एक ना अनेक समस्या निर्माण होतात. मात्र या समस्यांवर हे घरगुती उपाय केल्यास केसातील कोंडा दूर होतो.

लिंबाचा रस – केसात कोंडा झाला असल्यास गरम तेलात लिंबाचा रस टाकून त्या तेलाने केसाला मालिश करावे. यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते. तसेच लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी,ए,बी,फॉस्फरस आणि अँटी ऑक्सिंडट्स असल्याने केसाला एक वेगळीच चमक येते.

- Advertisement -

मेथी – दोन चमचे मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. ही भिजलेली मेथी सकाळी वाटून याचा लेप केसाला लावून ३० मिनिटे ठेवा आणि केस नंतर स्वच्छ धुऊन घ्या यामुळे कोंडा नष्ट होण्यास मदत होते.

दही आणि काळीमिरी – दह्यामध्ये काळीमिरी वाटून तयार मिश्रण केसाला लावावे. हा प्रयोग आठवड्यातून एकदा तरी करावा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो.

- Advertisement -

आवळा – आवळा तेल किंवा आवळ्याची पेस्ट केसाला लावल्याने केसातील कोंडा त्वरीत निघून जातो.

लसूण – लसणाच्या चार ते पाच पाकळ्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही तयार झालेली पेस्ट केसांना लावल्याने कोंडा कमी होतो.

बेकिंग सोडा – शॅम्पूमध्ये बेकिंग सोडा मिसळून हे मिश्रण केस धुण्यासाठी वापरावे. यामुळे कोंडा निघून जातो.

कच्ची पपई – केसातील कोंडा दूर करण्यासाठी कच्च्या पपईची पेस्ट तयार करुन ही पेस्ट केसाला लावावी. यामुळे कोंड्याची समस्या दूर होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -