‘असा’ घालवा ओठांचा काळपटपणा

home remedies for dark lips
'असा' घालवा ओठांचा काळपटपणा

प्रत्येक तरुणीला आपण सुंदर दिसावे, असे वाटत असते. मग, त्याकरता आपली काहीही करायची तयारी असते. विशेष म्हणजे सौंदर्य हे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. मग ओठांच्या सौंदर्यासह आपले हास्य देखील आपली ओळख मानली जाते. आपल्याला समोरच्या व्यक्तीने स्मित हास्य दिले की ती व्यक्ती अधिकच सुंदर दिसून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नकळत आनंद पसरतो. त्यामुळे याकरता आपले ओठ गुलाबी असणे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे आज आपण ओठांचा काळपटपणा दूर कसा करावा, हे पाहणार आहोत.

मध आणि साखर

मध आणि साखर आपल्या सगळ्यांच्याच घरात असते. मग आपल्याला आठवड्यातून तीन दिवस फक्त पाच मिनिटं वेळ काढून एक चमचा साखर आणि एक चमचा मध, असं मिश्रण घेऊन एक मिनिटभर ते आपल्या ओठांवर हलक्या हाताने चोळायचं आहे. यामुळे तुमच्या ओठांचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते.

डाळिंबाचे दाणे

बऱ्याचदा उन्हात जास्त वेळ राहिल्याने मेलॅनिन जास्त प्रमाणात तयार होतं आणि त्यामुळे ओठांना काळपटपणा येतो. यावर डाळिंब एक रामबाण उपाय आहे. डाळिंबामध्ये ‘पुनीकॅगालीन’ नावाचं एक द्रव्य असतं, ज्यामुळे मेलॅनिन, पिगमेंटेशन कमी होते आणि ओठ गुलाबी होण्यास मदत होते. याकरता डाळिंबाच्या बिया मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायच्या आणि त्यात ताजी साय घालून पेस्ट करून घ्यायची आणि रोज ओठांवर पाच मिनिटांसाठी लावून ठेवावे यामुळे चांगला फायदा होतो.

लिंबू आणि बदाम तेल

लिंबामुळे त्वचेवरचे डाग कमी होतात. पण, याच लिंबामुळे ओठांचा सुद्धा काळपटपणा जाऊन ओठांना नैसर्गिक गुलाबी छटा येते. अर्ध्या लिंबाचा रस एक चमचा बदामाच्या तेलात घालून नीट मिक्स करून ओठांना रोज रात्री झोपताना लावला यामुळे महिनाभरात फरक पडतो. लिंबामुळे ओठांचा काळपटपणा जातो आणि बदामाच्या तेलामुळे ते मऊ देखील होतात.


हेही वाचा – दातांचे सौंदर्य हे आरोग्याचे लक्षण