घरलाईफस्टाईल'या'मुळे मधुमेह राहतो नियंत्रणात

‘या’मुळे मधुमेह राहतो नियंत्रणात

Subscribe

मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी खालील दिलेल्या गोष्टींचे सेवन करा.

बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनशैलीत सारखे बदल होत असतात. त्याप्रमाणे खाण्या – पिण्याची पथ्ये पाळली नाहीत तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी खबरदारी घ्यावी. तर ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा परिस्थितीत मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय केल्यास तुमचा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल. पाहुया असे काही घरगुती उपाय.

आवळा ज्यूस

१० मिलिलीटर आवळ्याचा ज्यूस आणि दोन ग्रॅम हळद पावडर एकत्रित करा. एकत्रित केलेले मिश्रण दिवसातून दोन वेळा घेतल्याने शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

- Advertisement -

टोमॅटो ज्यूस

बऱ्याचदा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती कारल्याचे सेवन करतात. मात्र, मधुमेह कमी करण्यासाठी एक टोमॅटो, एक काकडी आणि एक कारले. या तिघांचा ज्यूस घ्यावा आणि ते एकत्र करून घेतल्यास. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मधुमेह कमी होतो.

बडीशेप

अनेक जणांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. ही सवय चांगली असून ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, अशा व्यक्तीने बडीशेपचे सेवन करावे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

- Advertisement -

जांभूळ

मधुमेह व्यक्तींना गोड फळे खाण्यापासून अडवले जाते. परंतु, मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने जांभूळ या फळाचे सेवन केल्यास शुगरचे प्रमाण कमी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -