Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthफूड पॉयझनिंग झाल्यास घरगुती उपाय

फूड पॉयझनिंग झाल्यास घरगुती उपाय

Subscribe

बऱ्याचदा काहींना वेगळं किंवा रस्त्यावरचे पदार्थ खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होते. अशावेळी डॉक्टरकडे जाण्याआधी यावर काही घरगुती उपाय करता येतात जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही हे उपाय घरच्या घरी केल्यास तुम्हाला तात्काळ बरं वाटेल.

फूड पॉयझनिंग झाल्यावर घरगुती उपाय

Nausea After Eating: 7 Causes and How to Treat It

- Advertisement -

फूड पॉयझनिंग झाल्यानंतर तेलकट खाणं टाळावे तसेच डेअरी उत्पादन, कॅफीन आणि दारू यापासूनदेखील दूर राहावे. फूड पॉयझनिंग झाल्यानंतर सतत पाणी पित राहणं गरजेचं आहे.

  • लसूण

लसणात अँटी व्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल हे गुण असतात. यामुळे डायरिया आणि पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो. 1-2 लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यायल्यास त्वरीत आराम मिळतो.

- Advertisement -
  • अॅप्पल व्हिनेगर

अॅप्पल व्हिनेगरमध्ये असणाऱ्या अॅसिडमुळे जळजळ कमी होते आणि लगेच आराम मिळतो. 2 चमचा अॅप्पल व्हिनेगर एक ग्लास गरम पाण्यात घालून घ्यावे आणि खाण्यापूर्वी हे ग्लासभर पाणी प्यावे.

  • लिंबू पाणी

लिंबू पाण्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढवणारे बॅक्टेरिया कमी होतात. तसंच आपलं पचनतंत्र व्यवस्थित राखण्यासाठी लिंबू पाणी रोज प्यायल्यास चांगलं असतं. चिमूटभर साखर लिंबू पाण्यात मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा प्यावे. यामुळं फूड पॉयझनिंग कमी होते.

  • मध

मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असते. मधामुळे अॅसिडिटी कमी होते आणि फूड पॉयझिनिंगपासून आराम मिळतो. 1 चमचा मध दिवसभरातून किमान 3 वेळा घ्यावे. त्यामुळे शरीरात अॅसिड बनत नाही आणि पोटाला आराम मिळतो.

  • तुळस

तुळशीमुळे पोटदुखीच्या समस्यांपासून सुटका होते आणि फूड पॉयझनिंगदेखील दूर होते. यामधील अँटी मायक्रोबियल गुणामुळे पोटातील कोणताही बॅक्टेरिया मारून टाकण्याचं काम तुळस करते. 2- 3 कप पाण्यात ताजी तुळशीची पानं टाकून उकळून घ्यावं. हे पाणी थंड झाल्यावर दिवसातून 2- 3 वेळा प्यावे.

 


हेही वाचा :

आहारात काळ्या मिरीचा वापर ठरेल आरोग्यकारी

- Advertisment -

Manini