आजकाल डोकेदुखी सामान्य समस्या झाली आहे. यामागे वाढता स्क्रीन टाइम, ताण, थकवा अशी बरेच कारणे आहेत. डोकेदुखीच्या समस्या थांबवण्यासाठी बरेचजण पेन किलरचा आधार घेतात. पण, पेन किलरमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशावेळी पेन किलर न घेता घरगुती उपाय करायला हवेत. डोकेदुखीवर सोपे घरगुती उपाय करता येतील. या घरगुती उपायांमुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होण्याची शक्यताही राहणार नाही आणि डोकेदुखी थांबेल.
घरगुती उपाय –
- डोकेदुखी दूर करण्यासाठी तुळशीचा वापर करता येईल. तुळशीच्या बिया बारीक करुन त्याची पेस्ट कपाळाला लावा.
- जवस खाणे हे डोकेदुखी थांबवण्यासाठी सर्वात सोपा उपाय मानला जातो. जवसातील ओमेगा 3 फॅटी ऍसिड डोकेदुखी कमी करते.
- डोकेदुखी थांबवण्यासाठी आल्याचे पाणी प्यावे. आल्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात आल्याची पेस्ट मिक्स करा आणि ते पाणी प्या.
- लव्हेंडरचे तेलही डोकेदुखीवर रामबाण ठरते. यासाठी लव्हेंडरच्या तेलाने डोक्याची चंपी करावी.
- डोकेदुखी दूर करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरची वाफ घ्यावी. हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो.
- सतत डोकेदुखीचा त्रास असेल तर दररोज मुक्त होण्यासाठी योग आणि ध्यान करावे. योग आणि ध्यान्याच्या सरावाने डोकेदुखी नक्कीच कमी होऊ शकते.
- पुदीन्याची पाने खावेत. डोकेदुखी दूर करण्यासाठी हा सर्वात घरगुती सोपा आहे.
- डोकेदुखीला पळवण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे. यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करा. यामुळे डोकेदुखी नक्कीच थांबेल.
- दालचिनीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आढळतात. डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी दालचिनीचे 2 ते 3 तुकडे घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. तयार पेस्ट डोक्याला लावावी. हा लेप अर्धा तास राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. आराम मिळेल.
हेही पाहा –